शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:49 IST

Women's Reservation Bill 2026 Voting Live: कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत महिला आरक्षण संविधान दुरुस्ती विधेयक मांडले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मतदानासाठी लॉबी रिकामी करण्याचे आदेश दिले होते.

नवी दिल्ली: महिला आरक्षण आणि लोकसभेच्या जागा वाढवण्याशी (परिसीमन) संबंधित अत्यंत महत्त्वाचे 'संविधान दुरुस्ती विधेयक' आज लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सरकारला आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. संख्याबळ अभावी हे विधेयक फेटाळले गेले आहे.

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत महिला आरक्षण संविधान दुरुस्ती विधेयक मांडले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मतदानासाठी लॉबी रिकामी करण्याचे आदेश दिले होते.

मतदानाचे गणित आणि तांत्रिक अडचण:

सभागृहात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये:

  • विधेयकाच्या बाजूने: २९८ मते

  • विधेयकाच्या विरोधात: २३० मते

विधेयक का मंजूर झाले नाही? भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३६८ नुसार, कोणत्याही घटनादुरुस्ती विधेयकासाठी सभागृहात उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान ६६.६% (२/३) सदस्यांचे समर्थन असणे अनिवार्य असते. ५२८ एकूण मतांपैकी सरकारला विजयासाठी ३५२ मतांची आवश्यकता होती, मात्र केवळ २९८ मते मिळाल्याने हे विधेयक ५४ मतांनी मागे पडले.

दक्षिण भारतातील राज्यांचा तीव्र विरोध

विधेयक पडण्यामागे 'परिसीमन' हा मुख्य मुद्दा ठरला. २०२६ नंतर होणाऱ्या लोकसभेच्या जागांच्या पुनर्रचनेमुळे दक्षिण भारतातील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होऊन उत्तर भारताचे वर्चस्व वाढेल, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. काँग्रेससह इंडिया आघाडीतील २३० खासदारांनी या मुद्द्यावरून विधेयकाच्या विरोधात कौल दिला. 

वादाचा मुख्य मुद्दा 'परिसीमन'विरोधकांनी महिला आरक्षणाला तत्वतः पाठिंबा दिला असला तरी, या विधेयकात समाविष्ट असलेल्या 'परिसीमन' (लोकसभेच्या जागा वाढवणे) प्रक्रियेला तीव्र विरोध केला. विशेषतः दक्षिण भारतीय राज्यांच्या जागांचे प्रमाण कमी होईल आणि उत्तर भारताचे वर्चस्व वाढेल, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. हे विधेयक फेटाळले गेल्यामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेला मोठा ब्रेक लागला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी "परिसीमनामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही," असे आश्वासन दिले होते, मात्र मतदानातून विरोधकांनी सरकारला मोठा धक्का दिला आहे.केंद्र सरकारने महिला आरक्षण लागू करणे आणि लोकसभेच्या जागांची संख्या वाढवणे यासारखे ३ विधेयक लोकसभेत सादर केलेत. ही विधेयके १६ एप्रिल २०२६ रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात सभागृहात मांडण्यात आली. २०२९ पर्यंत महिला आरक्षण लागू करणे हे सरकारचे लक्ष्य आहे. त्यामुळे लोकसभेतील जागांची संख्या ५४३ हून वाढून ८५० इतकी करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संसदेत ३ वेगवेगळी विधेयके सादर करण्यात आली. ज्यात संविधान(१३१ वी सुधारणा) विधेयक २०२६, सीमांकन विधेयक २०२६ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयक २०२६ यांचा समावेश आहे. पहिल्याच विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Women's Reservation Bill Fails in Lok Sabha; 211 MPs Oppose

Web Summary : The Women's Reservation Bill, aiming for quota and constituency delimitation, failed in Lok Sabha. It lacked the required two-thirds majority, securing only 278 votes against 211. Opposition opposed delimitation fearing reduced representation for Southern states. The bill needed 326 votes to pass.
टॅग्स :lok sabhaलोकसभाWomen Reservationमहिला आरक्षणcongressकाँग्रेसBJPभाजपा