17 Apr, 26 11:23 AM
नाशिक धर्मांतर प्रकरण: अमित ठाकरे रोखठोक बोलले
नाशिकमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये धर्मांतर प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे यांनी १०० टक्के सगळ्या कंपन्यांचं ऑडिट करण्याची मागणी केली. तसंच मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड द्यावा, सगळे प्रकार थांबतील, मी असतो आरोपींना थेट फाशी दिली असती, असं अमित ठाकरे म्हणाले.
17 Apr, 26 11:20 AM
मुंबईतील ड्रग्ज पार्टीवर अमित ठाकरे संतापले
शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जात आहेत. एका माणसाचं नाव समोर आलं की त्याच्याबद्दल आपण बोलायला लागतो. पण इतरांचं काय? त्यामुळे कठोर कारवाई करुन यांची नाकेबंदी केली पाहिजे- अमित ठाकरे
17 Apr, 26 10:41 AM
भारतीय खलाशांचा बळी खपवून घेणार नाही" होर्मुजमधील हल्ल्यांवरून भारताने ठणकावले
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भारताने आता जागतिक स्तरावर कडक भूमिका घेतली आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतील वाढते धोके आणि व्यापारी टँकर्सना मिळणाऱ्या धमक्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला असून, या भागात त्वरित शांतता आणि सुरक्षित वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
17 Apr, 26 10:06 AM
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी,
भारतीय शेअर बाजारातील आजच्या सत्राची सुरुवात अत्यंत संथ आणि चढ-उतारांनी भरलेली राहिली. जागतिक संकेत आणि कंपन्यांचे तिमाही निकाल या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई (BSE) सेन्सेक्स ३४.४९ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७८,०२३.१७ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.
17 Apr, 26 09:58 AM
इम्फाळमध्ये हजारो लोकांचा मशाल मोर्चा; आंदोलक आणि सुरक्षा दलांत जुंपली
दोन मुलांच्या मृत्यूनंतर मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश झुगारून हजारो लोक मशाली घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. एका बॉम्ब हल्ल्यात दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता, त्याविरोधात हा संताप व्यक्त करण्यात आला. या मोर्चादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये धुमश्चक्री उडाली, ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली.
17 Apr, 26 09:49 AM
वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. डभरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंघीतराई ग्रामपंचायत स्थित वेदांता पॉवर प्लांटमध्ये १४ एप्रिल रोजी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. या गंभीर घटनेबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेत वेदांता कंपनीचे संचालक अनिल अग्रवाल, व्यवस्थापक देवेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केलाय.
17 Apr, 26 09:46 AM
गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून हे स्थान मिळवलं आहे. 'ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्स'नुसार, अदानी यांची एकूण संपत्ती (Net Worth) आता ९२.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचलीये.
17 Apr, 26 09:31 AM
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार?
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते.
17 Apr, 26 09:36 AM
अमरावती सेक्स स्कँडल: एका फ्लॅटमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचे शोषण
परतवाड्याच्या अयान अहमद नामक नराधमाने स्वतःच्या ऐयाशीसाठी अल्पवयीन मुलींच्या आयुष्याची राखरांगाेळी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आता अमरावती शहरातील उच्चभ्रू वस्तीपर्यंत पोहोचली आहे. आरोपी मानव सुगंधे (२०) याने स्वत: एक भाड्याने घेतलेला फ्लॅट मुलींवर अत्याचार करण्यासाठी अयान अहमदला चक्क ‘तासिका तत्त्वावर’ भाड्याने दिला होता.
17 Apr, 26 09:37 AM
राज्यात रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते?
राज्यात १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा चाचणी सक्तीची करण्यात येणार आहे. मात्र, या भाषा प्रावीण्य चाचणीसाठी आवश्यक असलेल्या मानक कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) अद्याप अंतिम झालेल्या नाहीत. परिवहन विभागाकडून १ मेपूर्वी त्या अंतिम करून राज्यातील ५९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) लागू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
17 Apr, 26 09:28 AM
सूर्य कोपला, महाराष्ट्रात उन्हाच्या झळा
मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता. नागरिकांनी उन्हात जाणं टाळावं किंवा पूर्ण खबरदारी घेऊनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. १९ एप्रिलनंतर तापमानात घट, काही ठिकाणी पावसाच्या सरी.