शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 06:38 IST

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते.

मुंबई -  विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.  २०२० मध्ये या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हा भाजपला चार, एकत्रित शिवसेनेला दोन, एकत्रित राष्ट्रवादीला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदार असतात. 

यावेळी २०१९ च्या तुलनेत चित्र पूर्णत: बदलले आहे. महायुतीकडे २३५ एवढी आमदार संख्या असल्याने त्यांचे नऊपैकी आठ आमदार जिंकतील, अशी स्थिती आहे. भाजपने सहावा उमेदवार दिला तर निवडणूक चुरशीची होऊ शकेल. मात्र ती शक्यता कमी आहे.  विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा निवडून आणता येणार आहे.

उद्धव ठाकरे पुन्हा आमदार, की?... उद्धव ठाकरे  २०२० मध्ये विधान परिषद सदस्य झाले. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी, असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचे म्हटले जाते. विधिमंडळातील पक्षाची घडी नीट राहावी, यासाठी त्यांचे आमदार होणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह पक्षात आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्कंठा आहे. ते रिंगणात राहिले तर निवडणूक बिनविरोध करण्याकडे भाजपचाही कल असेल. राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता व ती निवडणूक बिनविरोध झाली होती. 

हे आमदार होणार निवृत्तउद्धव ठाकरे : उद्धवसेनाडॉ. नीलम गोऱ्हे : शिंदेसेनाशशिकांत शिंदे : राष्ट्रवादी - शरद पवार रणजितसिंह मोहिते पाटील, दादाराव केचे, संदीप जोशी, संजय केणेकर : भाजपअमोल मिटकरी : राष्ट्रवादी - अजित पवारराजेश राठोड : (काँग्रेस)

९ जागांसाठी १२ मे रोजी होणार मतदानअधिसूचना निघणार : २३ एप्रिलअर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल छाननी : २ मेअर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ४ मेमतदान - १२ मे सकाळी ९ ते दुपारी ४मतमोजणी : सायंकाळी ५निवडणूक बिनविराेध करण्यास हालचाली हाेणार.

English
हिंदी सारांश
Web Title : Legislative Council Election: Close Contest Possible; Thackeray's Future in Focus

Web Summary : Maharashtra's Legislative Council elections on May 12th may see a tight contest if the Mahayuti fields an extra candidate. With their majority, Mahayuti can win eight seats. Uddhav Thackeray's potential return to the council is also a key point, amid party pressure for him to rejoin.
टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Vidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी