शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

By योगेश पांडे | Updated: April 16, 2026 22:23 IST

दुचाकीवरून पडून झाला अपघात : वेळेत मदत न मिळाल्याने गेले जीव

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला. दोघेही तृतीय वर्षाचे विद्यार्थी होते व रात्री जेवण करून वसतिगृहात परत येताना कच्च्या रस्त्यावरील खोलगट भागात पडून त्यांचा अपघात झाला. विद्यापीठाजवळच निर्जन ठिकाणी ही घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे रात्रभर ते त्याच ठिकाणी पडून होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका विद्यार्थ्याचे वडील न्यायाधीश असून, दुसऱ्या विद्यार्थ्याचे वडील वकील आहेत. या प्रकारामुळे विधि विद्यापीठात खळबळ उडाली आहे. विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर गेले असताना प्रशासनाला कल्पना कशी आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

सक्षम विनोद बन्सोड (२०, पिरॅमिड सिटी, बेसा) व आर्यन रवींद्र सोनटक्के (२०, यवतमाळ) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सक्षमचे वडील विनोद बन्सोड हे वर्धा येथे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी असून, आर्यनचे वडील रवींद्र सोनटक्के हे यवतमाळ येथे वकील आहेत. सक्षम व आर्यन विधि विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होते. बुधवारी रात्री ते दोघे आणखी एका मित्रासह जेवायला गेले होते. येताना सक्षम व आर्यन एकाच मोटारसायकलवर होते, तर त्यांचा मित्र दुसऱ्या दुचाकीवर होता. तिघेही वर्धा मार्गावरून जेवण करून मध्यरात्रीच्या सुमारास परत आले. तिसरा मित्र वसतिगृहाच्या दिशेने आत गेला. मात्र सक्षम व आर्यन संस्कृत विद्यापीठाच्या दिशेने गेले. तेथे अंधार होता व वळणावर त्यांचे संतुलन बिघडले व दोघेही खोलगट भागात जाऊन पडले. संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड असल्यामुळे ते जखमी झाले. घटनास्थळ निर्जन होते व आजूबाजूला कुणीच नव्हते. रात्रभर ते तेथेच जखमी अवस्थेत पडून राहिले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी विधि विद्यापीठाशी संबंधित एक कर्मचारी त्या मार्गाने येत असताना त्याला दोघेही पडलेले दिसले. काही अंतरावर त्यांची मोटारसायकल पडली होती. त्याने तातडीने विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली. पोलिसांनादेखील हे कळविण्यात आले. दोघांनाही एम्समध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. एम्समध्येच शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले.एकाचा मोबाइल डिस्चार्ज, दुसरा हॉटेलमध्ये विसरलासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन हा त्याचा मोबाइल हॉटेलमध्ये विसरला होता, तर सक्षमचा मोबाइल डिस्चार्ज झाला होता. त्यामुळे अपघात झाल्यानंतर ते कुणालाही संपर्क करू शकले नाहीत. जर एखाद्याजवळ जरी मोबाइल असता तर सहजपणे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला असता व त्यांना वेळेवर मदत मिळू शकली असती.रात्रभर शोधाशोध, संपर्कच नाहीविधि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी वसतिगृहाच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. मात्र तीन विद्यार्थी दुपारीच बाहेर गेले होते. मात्र रात्री निर्धारित वेळेत ते वसतिगृहात न दिसल्याने वॉर्डनने मित्रांना विचारणा केली. तेव्हा ते बाहेर गेल्याची बाब समोर आली. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. त्यांच्या मोबाइलवरदेखील संपर्क होत नव्हता. त्यांच्या पालकांनादेखील दोघेही वसतिगृहात नसल्याची बाब रात्रीच कळविण्यात आली. ते गेलेले हॉटेल तसेच बेसा, मनीषनगरपर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र कुठेही पत्ता लागला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे दोघेही विद्यापीठापासून काही अंतरावरच जखमी अवस्थेत पडले होते. मात्र त्या दिशेने ते जातील याची कल्पनाच न आल्याने तिकडे कुणीच गेले नाही.पोलिसांनी गोपनीयता बाळगण्याचे कारण काय?काही दिवसांअगोदर विद्यार्थिनींच्या वसतिगृहात रॅगिंगचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात विद्यापीठ व पोलिसांकडून गोपनीयता बाळगण्यात आली होती. आता या अपघात प्रकरणातदेखील पोलिसांकडून कुठलीच माहिती देण्यात आली नाही. बुटीबोरीचे प्रभारी ठाणेदार नीलेश चावरे यांनी मी कुठलीही माहिती देऊ शकत नाही, असे सांगत हात वर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Law students die in accident near Nagpur university after night ordeal.

Web Summary : Two law students died in an accident near their university in Nagpur. They were found injured after a late-night accident. One student's father is a judge, the other a lawyer.
टॅग्स :Accidentअपघात