Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी

मयांक रावत याला मुंबई इंडियन्सच्या संघाने दिली पदार्पणाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:39 IST

Open in App

मुंबईतील वानखेडेच्या मैदानातील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माशिवाय मैदानात उतरला आहे. सलामीवीराच्या रुपात हिटमॅनच्या जागी क्विंटन डीकॉकला संधी देण्यात आली. याशिवाय MI च्या संघात आणखी एक मोठा बदल करण्यात आला. मिचेल सँटनरच्या जागी युवा भारतीय अनकॅप्ड मयांक रावत याला मुंबई इंडियन्सच्या संघाने पदार्पणाची संधी दिली आहे.

कोण आहे मयांक रावत? एका ओव्हरमध्ये स्टार झालेल्या हिरोला MI नं दिली संधी

दिल्लीमध्ये जन्मलेला मयांक रावत हा  हा उजव्या हाताने फलंदाजी करणारा खेळाडू असून तो उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजीही करू शकतो. तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचाही भाग राहिला आहे.  ऑलराउंड क्षमतेमुळे तो संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उपयुक्त ठरू शकतो. दिल्लीच्या या युवा पठ्ठ्यानं दिल्ली प्रिमियर लीगमध्ये एका षटकात पाच षटकार मारून मैफील लुटली होती. याच स्पर्धेतून तो प्रकाश झोतात आला. मिनी लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने या खेळाडूला ३० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mayank Rawat Debuts for Mumbai Indians After Five-Sixes Feat

Web Summary : Mayank Rawat, known for hitting five sixes in an over in the Delhi Premier League, debuted for Mumbai Indians against Punjab Kings. The all-rounder replaced Mitchell Santner in the lineup after being bought in the mini auction.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सपंजाब किंग्सआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग