भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी लाखांमध्ये कारची विक्री करते. लाथ मारेन तिथून पाणी काढेन अशाच अविर्भावात कोणतीही नवीन कार काढली की तिचा सेल होतो. परंतू, या कंपनीवरही काहीवेळा नामुष्कीची वेळ येते. चालली नाही म्हणून अशीच एक कार आठ वर्षांतच बंद करण्याची वेळ मारुती सुझुकीवर आली आहे.
नेक्सा आउटलेटमधील ओबडधोबड कार 'इग्निस' संदर्भात मारुतीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेतून मारुती इग्निसचे उत्पादन बंद केले असून, आता तिच्या जागी एक नवीन आधुनिक मायक्रो एसयूव्ही लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. २०१७ मध्ये मारुतीने ही कार लाँच केली होती. महिन्याला २५०० हजाराच्या आसपासच या कारचा सेल होत होता. तो हळूहळू एवढा कमी झाला की रस्त्यावर देखील या कार फारशा दिसत नव्हत्या.
इग्निस का बंद झाली?मारुती इग्निसने तिच्या युनिक डिझाइनमुळे सुरुवातीला ठीकठाक प्रतिसाद मिळवला होता. मात्र, गेल्या काही काळापासून टाटा पंच आणि ह्युंदाई एक्स्टर यांसारख्या मायक्रो एसयूव्हीच्या वाढत्या स्पर्धेमुळे इग्निसच्या विक्रीत घट झाली होती. ग्राहकांना आता अधिक फीचर्स आणि एसयूव्ही सारखा लूक असलेल्या कार्स हव्या आहेत, जे इग्निसमध्ये कमी पडत होते.
नवीन 'Y43' घेणार जागाइग्निसची जागा घेण्यासाठी मारुती सुझुकी सध्या 'Y43' (कोडनेम) या नवीन मायक्रो एसयूव्हीवर काम करत आहे. ही नवीन कार टाटा पंचला थेट टक्कर देईल. यामध्ये १.२ लिटरचे झेड-सीरिज पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. ही कार पूर्णपणे एसयूव्ही लूक आणि आधुनिक इंटिरिअरसह येईल. ही कार २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला बाजारात दाखल होऊ शकते.
Web Summary : Maruti Suzuki discontinued the Ignis after eight years due to declining sales. Competition from Tata Punch and Hyundai Exter impacted its market share. A new micro SUV, codenamed Y43, is planned to replace it, targeting a 2026/27 launch.
Web Summary : मारुति सुजुकी ने कम बिक्री के कारण आठ साल बाद इग्निस का उत्पादन बंद कर दिया। टाटा पंच और हुंडई एक्सटर से प्रतिस्पर्धा ने बाजार हिस्सेदारी को प्रभावित किया। एक नई माइक्रो एसयूवी, जिसका कोडनेम Y43 है, 2026/27 में लॉन्च होने की संभावना है।