शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:49 IST

Actor-Politician Vijay : महत्वाचे म्हणजे, विजय यांचा TVK पक्ष कोणत्याही मोठ्या आघाडीचा भाग न होता सर्व २३४ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. विजय स्वतः पेरम्बूर आणि त्रिची ईस्ट या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तमिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता विजय यांच्या 'तमिळगा वेट्टी कड़गम' (TVK) पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. निवडणुकीत पहिल्यांदाच आपले नशीब आजमावात असलेल्या विजय यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिला आणि तरुणांसाठी जबरदस्त घोषणा केल्या आहेत. मोफत गॅस सिलिंडरपासून ते लग्नासाठी सोन्यापर्यंत आणि पदविधर तरुणांना अर्थसहाय्यापर्यंत मोठ मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. 

महिला वर्ग केंद्र स्थानी - विजय यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिला वर्गाला केंद्र स्थानी ठेवले आहे. ६० वर्षांखालील महिलांना दरमहा २,५०० रुपयांची मदत, प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ६ मोफत गॅस सिलिंडर आणि गरीब कुटुंबातील महिलांना लग्नासाठी ८ ग्रॅम सोने तसेच उच्च दर्जाची सिल्क साडी देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पक्षाने २३४ जागांपैकी २४ जागांवर महिला उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना राजकारणातही संधी दिली आहे.

तरुणांसाठीही मोठ्या घोषणा - तरुणांना आकर्षित करण्यासाठी या जाहीरनाम्यात, पदवीधरांना दरमहा ४००० रुपये आणि डिप्लोमा धारकांना २००० रुपये भत्ता देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, खासगी उद्योगांमध्ये तमिळ लोकांसाठी ७५ टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचे आणि तरुणांना व्याजमुक्त स्टार्टअप कर्ज देण्याचे आश्वासनही विजय यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात दिले आहे.

महत्वाचे म्हणजे, विजय यांचा TVK पक्ष कोणत्याही मोठ्या आघाडीचा भाग न होता सर्व २३४ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. विजय स्वतः पेरम्बूर आणि त्रिची ईस्ट या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तमिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay's manifesto: Gold for women, cash for youth, gas subsidy!

Web Summary : Actor Vijay's party unveils manifesto for Tamil Nadu elections. Promises include gold for women's weddings, monthly allowance for women, unemployment benefits for graduates, free gas cylinders, and interest-free startup loans for youth. 75% job reservation for Tamils in private sector also pledged.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक 2026