अमेरिकेशी झालेल्या चर्चेनंतर इराणने नवीन प्रस्ताव मांडला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाऊ शकते आणि युद्ध हळूहळू संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जलवाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरु होऊ शकते.
अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान सादर केलेल्या प्रस्तावांनुसार, इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या ओमानच्या बाजूने जहाजांना हल्ल्याच्या धोक्याशिवाय मुक्तपणे जाण्याची परवानगी देण्याचा विचार करू शकतो. या निर्णयाचा उद्देश नवीन युद्ध टाळणे हा आहे.
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
इराण भूसुरुंग हटवेल की इस्रायलशी संबंधित जहाजांसह सर्व जहाजांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जाण्याची परवानगी देईल, हे अस्पष्ट आहे. अमेरिका इराणचा प्रस्ताव स्वीकारेल की नाही, हे पाहणे बाकी आहे. व्हाईट हाऊस आणि इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हा प्रस्ताव सध्या विचाराधीन
अहवालानुसार, एका पाश्चात्य सुरक्षा सूत्राने सांगितले की, जहाजांना ओमानच्या सागरी हद्दीतून निर्बंधांशिवाय जाण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, पण अमेरिकेने यावर प्रतिसाद दिला आहे की नाही हे अद्याप कळलेले नाही. टोल वसुली आणि अमेरिकेच्या नाकेबंदीबद्दल इराणच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव आला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी, सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याच्या इराणच्या कल्पनेला विरोध केला आहे. यामुळे एक धोकादायक पायंडा पडेल, असा इशारा आयएमओने दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही इराण आणि ओमान यांच्या दरम्यान असलेली ३४ किलोमीटर रुंदीची एक अरुंद जलवाहिनी आहे. हा आखातापासून हिंद महासागरापर्यंतचा एक महत्त्वाचा मार्ग असून, मध्यपूर्वेकडील ऊर्जा पुरवठ्यासाठी तसेच खतांसारख्या इतर वस्तूंच्या वाहतुकीसाठी एक प्रमुख वाहिनी आहे.
Web Summary : Iran proposes opening the Strait of Hormuz, potentially ending conflict. Ships could pass freely via Oman. The US hasn't responded. Concerns over tolls and blockades persist, with IMO opposing toll ideas. This key waterway is vital for global energy transport.
Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य खोलने का प्रस्ताव दिया है, जिससे युद्ध समाप्त हो सकता है। जहाजों को ओमान के रास्ते स्वतंत्र रूप से गुजरने की अनुमति मिल सकती है। अमेरिका ने अभी तक जवाब नहीं दिया है। टोल और नाकेबंदी को लेकर चिंताएं बनी हुई हैं, आईएमओ टोल विचारों का विरोध कर रहा है। यह जलमार्ग वैश्विक ऊर्जा परिवहन के लिए महत्वपूर्ण है।