शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:58 IST

कुठल्याही भ्रमात राहू नका. आपण देशातील नारी शक्तीला काही तरी देतोय हा भ्रमही राहू नये. हा त्यांचा अधिकार असून आपण इतकी दशके त्यांना रोखले असं महिला आरक्षणावर मोदींनी सांगितले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणावर सर्व विरोधी पक्षांना सोबत येण्याचं आवाहन केले आहे. महिला आरक्षण विधेयकाला राजकीय तराजूत मापू नका. अर्ध्या लोकसंख्येला आपण रोखू शकत नाही. मला याचे राजकीय श्रेय घ्यायचे नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून हे विधेयक पारित करावे. तुम्हाला हवे तर क्रेडिट तुम्हीच घ्या आणि हे विधेयक मंजूर करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत म्हणताना विरोधकांना ऑफरही दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी तुम्हाला ब्लँक चेक देत आहे. जर तुम्हाला क्रेडिट घ्यायचं असेल तर आम्ही सरकारी पैशातून तुमच्या सगळ्यांचे फोटो छापण्यास तयार आहोत. तुम्ही ज्या कुणाचे फोटो द्याल त्या सगळ्यांचा फोटो सरकारी खर्चातून प्रसिद्ध करू परंतु हे विधेयक संसदेत पारित व्हायला द्यावे असं त्यांनी लोकसभेत विरोधकांना सांगितले.

तसेच कुठल्याही भ्रमात राहू नका. आपण देशातील नारी शक्तीला काही तरी देतोय हा भ्रमही राहू नये. हा त्यांचा अधिकार असून आपण इतकी दशके त्यांना रोखले. आज त्याची भरपाई करण्याची आणि त्या गुन्ह्यापासून सुटका करून घेण्याची संधी आहे. कशाप्रकारे चलाखीचा वापर केला गेला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण त्याच्या बाजूने आहोत पण प्रत्येक वेळी काहीतरी तांत्रिक कारण देऊन ते थांबवण्यात आले. पण आता तुम्ही देशातील महिलांना ते समजावून सांगू शकणार नाही असंही मोदींनी म्हटलं. 

दरम्यान, सभागृहातील संख्याबळाचा खेळ नंतर उघडकीस येईल. आम्ही त्याला ३ दशके जाळ्यात अडकवून ठेवले, जे काही करायचे होते ते केले. आता जाऊ द्या भाऊ. येथील काही लोकांना वाटतं यात मोदींचा काही राजकीय स्वार्थ आहे. पण मला यात कोणताही राजकीय फायदा नाही, पण जर तुम्ही याला विरोध केला तर आम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. 

सीमांकनावर भेदभाव नाही, ही माझी गॅरंटी

दरम्यान, सीमांकनावरून कुठल्याही राज्यासोबत भेदभाव होणार नाही असं पंतप्रधान सांगत होते, तेव्हा एका महिला खासदाराने मध्येच अडवून याची गॅरंटी काय असा प्रश्न केला.त्यावर मोदींनी ही माझी गॅरंटी आहे. जर तुम्ही याला वचन म्हणत असाल तर मी वचन देतो. तामिळ भाषेत आश्वासनाला जर एखादा शब्द असेल तर तोही घेतो. सीमांकनाची प्रक्रिया कुठलाही भेदभाव करणार नाही असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी लोकसभेत दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi offers blank check for women's quota bill passage.

Web Summary : PM Modi urges opposition support for the women's reservation bill, offering full credit and publicity. He assures no demarcation bias, guaranteeing fair process, seeking unanimous passage after decades of delay.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाWomen Reservationमहिला आरक्षण