Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!

Rohit Sharma: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्ससमोर आता मोठे संकट उभे राहिले असून पंजाब किंग्ज विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:03 IST

Open in App

आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्ससमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची, यावरून संघ व्यवस्थापनात खलबतं सुरू आहेत. विशेष म्हणजे, रोहितची जागा घेण्यासाठी एका अशा खेळाडूचे नाव चर्चेत आहे, ज्याने अद्याप टी-२० क्रिकेटचा एकही सामना खेळलेला नाही.

पंजाब विरुद्धच्या सामन्याच्या आदल्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने फलंदाजीचा सराव केला. मात्र, त्याच्या सरावात नेहमीची तीव्रता आणि ताकद दिसून आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला रिटायर हर्ट व्हावे लागले. नेट्समध्ये रोहित फटके मारत असला तरी, दुखापतीमुळे तो १०० टक्के तंदुरुस्त नसल्याचे जाणवत होते. त्यामुळे तो खेळणार की नाही? याचा अंतिम निर्णय सामन्यापूर्वीच घेतला जाईल.

कोण आहे दानिश मालेवार?

रोहित शर्मा उपलब्ध नसल्यास विदर्भाचा २२ वर्षीय फलंदाज दानिश मालेवार याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने लिलावात दानिशला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते. दानिशबद्दलची सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्याने अद्याप एकही टी-२० सामना खेळलेला नाही. टी-२० सोडाच, त्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये अद्याप एकही व्हाइट-बॉल सामना खेळलेला नाही. त्याच्याकडे केवळ १५ प्रथम-श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. अनुभव नसला तरी मुंबईचे व्यवस्थापन या युवा खेळाडूवर मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

पंजाबविरुद्ध सामन्यात खेळण्याची शक्यता

मुंबईकडे अनुभवी सलामीवीर म्हणून क्विंटन डी कॉकचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, त्याला संघात घेतल्यास विदेशी खेळाडूंच्या कोट्याचे संतुलन बिघडू शकते. सध्या मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रायन रिकलटन (सलामीवीर),  शेरफेन रदरफोर्ड (मध्य फळी), मिचेल सँटनर (अष्टपैलू) आणि ट्रेंट बोल्ट हे चार विदेशी खेळाडू आहेत. डी कॉकला संधी द्यायची असल्यास यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल, जे संघाच्या एकूण रचनेसाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळेच भारतीय खेळाडू म्हणून दानिश मालेवारचे पारडे सध्या जड वाटत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Uncapped player may replace Rohit Sharma in Mumbai Indians.

Web Summary : Rohit Sharma's injury raises doubts before the Punjab Kings match. Uncapped Danish Malewar is a potential replacement. Despite lacking T20 experience, Malewar is considered due to foreign player quota issues, potentially making him the choice for Mumbai Indians.
टॅग्स :आयपीएल २०२६ऑफ द फिल्डरोहित शर्मा