Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:16 IST

How to pre-book cheap gold? अक्षय तृतीया २०२६ ला सोन्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. वाढत्या किमतींपासून वाचण्यासाठी आजच सोन्याचा रेट कसा लॉक करायचा आणि प्री-बुकिंगचे फायदे काय आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती.

अक्षय तृतीया हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मात्र, यंदा सोन्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडवले आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी असलेल्या अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,६२,००० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

जागतिक बाजारातील अस्थिरता, इराण-अमेरिका यांच्यातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच सोन्याच्या भावात १२ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १.५६ लाख रुपयांच्या आसपास आहे.

प्री-बुकिंगद्वारे करा पैशांची बचतवाढत्या किमतींपासून वाचण्यासाठी अनेक ज्वेलर्स ग्राहकांना 'प्री-बुकिंग'ची सुविधा देत आहेत. ग्राहक काही आगाऊ रक्कम देऊन आजच्या सोन्याच्या दरावर रेट 'लॉक' करू शकतात. जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे भाव वाढले, तरीही ग्राहकाला बुकिंग केलेल्या जुन्याच (कमी) दरात सोने मिळेल. प्री-बुकिंगवर अनेक ठिकाणी मेकिंग चार्जेसमध्ये सवलत आणि कॅशबॅक ऑफर्सही उपलब्ध आहेत.

आजचे सोन्याचे दर (१६ एप्रिल २०२६):

२४ कॅरेट: १,५३,३०५ रुपये (प्रति १० ग्रॅम)

२२ कॅरेट: १,४०,४२७ रुपये (प्रति १० ग्रॅम)

१८ कॅरेट: १,१४,९७९ रुपये (प्रति १० ग्रॅम)

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaya Tritiya 2026: Gold prices may soar! Book now to save.

Web Summary : Gold prices may hit ₹1.62 lakh by Akshaya Tritiya 2026. Pre-booking options offer rate locks, shielding buyers from rising costs. Current 24-carat gold rate is around ₹1.53 lakh per 10 grams.
टॅग्स :सोनंअक्षय्य तृतीया