Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:35 IST

Open in App
1 / 5

विराट कोहली: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ४९ धावांची खेळी करताना विराट कोहलीने १ षटकार ठोकला. या एका षटकारासह कोहली आता आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक १८५ षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.

2 / 5

केएल राहुल: विराटच्या या कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुल आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. राहुलच्या नावावर भारतीय सलामीवीर म्हणून सध्या १८४ षटकार नोंदवलेले आहेत.

3 / 5

रोहित शर्मा: आयपीएल इतिहासात एकूण सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम जरी रोहित शर्माच्या नावावर असला, तरी भारतीय सलामीवीर म्हणून तो १४८ षटकारांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. अव्वल स्थान गाठण्यासाठी त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

4 / 5

शिखर धवन: आयपीएलमधून निवृत्त झालेला 'गब्बर' म्हणजेच शिखर धवन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत सलामीवीर म्हणून खेळताना एकूण १४३ षटकार लगावले होते.

5 / 5

शुभमन गिल: गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल या यादीत पाचव्या क्रमांकावर असून तो या यादीतील सर्वात तरुण खेळाडू आहे. सलामीवीर म्हणून गिलच्या नावावर आतापर्यंत ११८ षटकार जमा आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२६विराट कोहलीलोकेश राहुलरोहित शर्माशिखर धवनशुभमन गिल