शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:08 IST

Strait of Hormuz Blockade : अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीची इराणसाठी नाकेबंदी केली. नाकेबंदी असतानाही इराणच्या सुपरटँकरने होर्मुझ सामुद्रधुनी पार करत आखातात प्रवेश केला. 

Iran vs USA News: पश्चिम आशियातील तणावाच्या काळात एक घटना होर्मुझ सामुद्रधुनी आणि पर्शियन गल्फमध्ये घडली आहे. अमेरिकेने इराणविरोधात भूमिका घेत होर्मुझ सामुद्रधुनी आणि बंदरांची नाकेबंदी केली आहे. मात्र, अमेरिकेच्या नाकेबंदीला वाकुल्या दाखवत इराणचे सुपरटँकर होर्मुझ सामुद्रधुनी पार करत आखातात पोहोचले आहे. 

इस्लामाबादमध्ये इराण अमेरिका यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझ सामुद्रधुनी आणि इराणी बंदरांची नाकेबंदी केली. इराणची तेल निर्यात रोखून त्यांच्या अर्थव्यवस्थेला तडाखा बसावा, या हेतूने ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. 

इराणच्या बंदरावर पोहोचले जहाज

अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे अनेक जहाजांना परत जावे लागले. पण, इराणच्या एका जहाजाने नाकेबंदीला हुलकावणी देत होर्मुझ पार केली. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या बंदीनंतरही सुपरटँकर होर्मुझ सामुद्रधुनी पार करून इमाम खामेनेई बंदरावर पोहोचले.  मिळालेल्या माहितीनुसार, आरएचएन नावाचे एक महाकाय जहाज इराणच्या बंदरावर दाखल झाले आहेत. २० लाख बॅरल तेल वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. त्यामुळे हे जहाज महत्त्वाचे आहे. एका दिवसापू्र्वीच अलिसिया नावाचे जहाजी नाकेबंदी असताना होर्मुझ पार करून आले. 

अमेरिकेसमोर शरणागतीस इराणचा नकार

इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने नाकेबंदी केली. पण, इराणकडून हा दबाव झुकारून लावला जात असल्याचे दिसत आहे. अमेरिका नाकेबंदी किती कठोरपणे राबवणार याची चाचपणी करण्याचे प्रयत्न इराणकडून केले जात असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, त्यांनी आतापर्यंत १० जहाजे रोखली आहेत. अनेक जहाजांना परत जावे लागले आहे. पण, इराणच्या सुपरटँकरने नाकेबंदी झुगारून लावली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Defies US Embargo: Supertanker Breaches Strait of Hormuz

Web Summary : Defying the US embargo, an Iranian supertanker successfully navigated the Strait of Hormuz, reaching the Persian Gulf. Despite US efforts to block Iranian oil exports, the tanker reached Imam Khamenei port, testing the limits of the American blockade.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाIranइराणWarयुद्ध