शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:15 IST

Nagpur Crime: नागपूरमधील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जादूमहल ते सिद्धेश्वर सभागृह मार्गावर ही घटना घडली.

Nagpur Crime News: गांजावरून काही दिवसांअगोदर झालेल्या वादाचे रक्तरंजित पडसाद उमटले व भर रस्त्यावर तरुणाची हत्या करण्यात आली. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जादूमहल ते सिद्धेश्वर सभागृह मार्गावर ही घटना घडली. १० ते १२ सिनेस्टाईल घेरून तरुणावर चाकूने वार केले.

सागर गिरधर सलामे (२२, सोरंखीवाडी, सेवादलनगर) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा मित्र हर्षल उर्फ ॲलेक्स शिंदे (२५, राणी भोसलेनेगर, भांडे प्लॉट) हा जखमी आहे. पीयूष कैथवास, अरविंद उर्फ चोख्या, शौर्य उर्फ भुऱ्या, साहिल कावेटिया व आणखी ६ ते ७ साथीदार आरोपी आहेत. 

सागरला कॉल केला आणि...

सर्व आरोपी सावित्रीबाई फुले नगर येथील रहिवासी आहेत. काही दिवसांअगोदर सागरचा काही मुलांसोबत गांजावरून वाद झाला होता व त्याने एका तरुणाच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केला होता. बुधवारी (१५ एप्रिल) रात्री हर्षल व सागर घराजवळील रॅलीत गेले होते. 

त्यानंतर सागरला एक फोन आला व दोघेही दुचाकीने सिद्धेश्वर सभागृहाजवळ पोहोचले. तेथे पोहोचल्यावर सागरने मी पोहोचलो असे समोरील व्यक्तीला सांगितले. त्यानंतर ते समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून जादूमहल चौकात पोहोचले. 

सागरवर चाकूने केले वार 

थोड्या वेळातच आरोपी दोन मोपेडवर आले व दोघांभोवती घिरट्या मारू लागले. त्यांचे इतर सहकारीदेखील पोहोचले व त्यांनी सागर-हर्षलला घेराव घातला. त्या दिवशी तूच डोक्यावर प्रहार केले होते ना असे विचारत आरोपींनी सागरला शिवीगाळ सुरू केली. 

सर्वांनी दोघांवरही लाकडी राफ्टर, दांडा व चाकूने हल्ला केला. पीयूष व त्याच्या सहकाऱ्यांनी सागरवर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत जीव वाचविण्यासाठी सागरने सिद्धेश्वर सभागृहाच्या दिशेने धाव घेतली. आरोपी त्याला त्या अवस्थेतदेखील मारत होते. काही अंतरावर जाऊन सागर निपचित पडला. त्यानंतर आरोपी फरार झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ganja Dispute Turns Deadly: Youth Murdered in Broad Daylight Attack

Web Summary : A drug dispute escalated into murder in Nagpur. Sagar Salame was fatally stabbed by a group of 10-12 attackers following a past argument over marijuana. His friend, Harshal Shinde, was also injured in the attack.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस