Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:11 IST

नकारात्मक विचार हे कधी भीतीपोटी असतात तर कधी काळजीपोटी, मात्र त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते हे नक्की, त्यासाठी ही दोन शब्दांची जादू!

आपल्या मनात येणारे विचार हे एखाद्या न थांबणाऱ्या रेडिओसारखे असतात. कधी ते गाणी गुणगुणतात, तर कधी भीती आणि काळजीचा पाढा वाचतात. अनेकदा आपल्याला वाटतं की, नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवणं अशक्य आहे. पण मानसशास्त्रात यावर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे, ज्याला 'रीफ्रेमिंग' (Reframing) असं म्हणतात.

नकारात्मक विचारांना दाबण्यापेक्षा किंवा त्यांच्याशी लढण्यापेक्षा, त्यांचा 'अँगल' (Angle) बदलणं कसं शक्य आहे, हे समजून घेऊ. 

नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे का?

हो, हे पूर्णपणे शक्य आहे! पण यासाठी 'कंट्रोल' करण्यापेक्षा 'मॅनेज' करण्यावर भर दिला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या चित्राची फ्रेम बदलतो, तेव्हा चित्र तेच राहतं पण त्याचं सौंदर्य बदलतं. अगदी असंच आपल्या विचारांच्या बाबतीतही घडतं.

१. विचारांना 'कॅच' करायला शिका (Identify the Thought)

नकारात्मक विचार चोरपावलांनी येतात आणि आपल्याला अस्वस्थ करून जातात. सर्वात आधी स्वतःच्या मनावर लक्ष ठेवा. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, तेव्हा स्वतःला विचारा— "या क्षणी माझ्या मनात कोणता विचार सुरू आहे?" > उदा: "माझ्याकडून हे प्रेझेंटेशन कधीच चांगलं होणार नाही." — हा विचार पकडणं ही पहिली पायरी आहे.

२. पुराव्यांची मागणी करा (Challenge the Thought)

आपले विचार म्हणजे 'सत्य' नव्हे. त्या विचाराला सांगा, "तुझ्याकडे काय पुरावा आहे? खरंच मी याआधी कधीच कोणतं काम चांगलं केलं नाहीये का?'' मी आता जी भीती बाळगतेय, ती खरोखर घडण्याची शक्यता किती टक्के आहे?''

जेव्हा आपण तर्कशुद्ध प्रश्न विचारतो, तेव्हा नकारात्मक विचारांची ताकद कमी होते.

३. 'रीफ्रेमिंग' करा (The Power of Reframing)

विचार तोच ठेवा, पण त्याची मांडणी बदला. नकारात्मक वाक्याला सकारात्मक किंवा प्रगतीशील वाक्यात रूपांतरित करा. उदाहरण पाहू.... 

नकारात्मक फ्रेम (Old Frame)नवीन 'रीफ्रेम' (New Frame)
"मी या विषयात पूर्णपणे अपयशी ठरले.""या अनुभवातून मला माझ्या चुका कळल्या, ज्या मी पुढच्या वेळी सुधारू शकेन."
"आजचा दिवस खूपच तणावपूर्ण आणि वाईट आहे.""आज कामाचा लोड जास्त आहे, पण मी महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे."
"मला कोणासमोर बोलायची खूप भीती वाटते.""मी आता शिकत आहे आणि मला माझे विचार मांडण्याची ही एक संधी आहे."

यावर प्रभावी ठरते : दोन शब्दांची जादू

नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी दोन शब्द तुमच्या शब्दकोशात जोडा:

अजून (Yet): "मला हे काम जमत नाही" ऐवजी "मला हे काम अजून जमत नाही" असं म्हणा. यामुळे तुमच्या मेंदूला शिकण्याची संधी मिळते.

तरीही (But still): "बाहेर पाऊस आहे, माझं वॉकिंग राहून गेलं, तरीही मी घरी योगा करून माझं फिटनेस रुटीन पूर्ण केलं."

अजून (Yet): 'माझी प्रिय व्यक्ती दूर जाण्याची भीती वाटते' ऐवजी 'माझी प्रिय व्यक्ती अजून माझ्या जवळ, माझ्या समोर आहे.'

तरीही (But still) : 'माझ्याकडून आयुष्यात अनेक चुका झाल्या' ऐवजी 'यापूर्वी अनेक चुका झाल्या तरीही मी माझं आयुष्य पूर्णपणे नव्याने जगत आहे.''

नकारात्मक विचार बदलण्याचे फायदे:

कमी ताण: शरीरातील 'स्ट्रेस हॉर्मोन्स' कमी होतात.

उत्पादकता (Productivity): कामात एकाग्रता वाढते.

चांगली झोप: रात्री झोपताना मन शांत राहिल्यामुळे झोप चांगली लागते.

छोटे वाटणारे शब्द तुमच्या विचारात मोठा बदल घडवून आणू शकतात, त्यासाठी गरज आहे विचारांना योग्य दिशा देण्याची. त्यासाठी नैराश्याच्या गर्तेत न जाता स्वतःला धीर द्या आणि या जादुई शब्दांच्या मदतीने स्वतःला नकारात्मकतेच्या कोंदणातून बाहेर काढा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Transform Negative Thoughts: Reframing with 'Yet' and 'But Still'.

Web Summary : Reframing negative thoughts using 'Yet' and 'But still' can improve mental well-being. Identify, challenge, and reframe negative thoughts to reduce stress, boost productivity, and improve sleep. These simple words offer a powerful shift towards positivity.
टॅग्स :मानसिक आरोग्य