संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी शफी शेख आणि रझा मेमन यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या सुनावणीनंतर न्यायालय परिसरात आरोपींच्या नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता.
न्यायालयाने कोठडी सुनावताच आरोपींचे नातेवाईक अय्याज काझी यांनी न्यायालय आवारात गोंधळ घातला. त्यांनी या प्रकरणाला राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
टार्गेट करण्याचा प्रयत्नमुस्लिम समाजाला मुद्दाम टार्गेट केले जात असून एका व्यक्तीच्या कृत्यामुळे संपूर्ण समाजाला दोषी धरणे चुकीचे आहे, असा दावा अय्याज काझी यांनी केला. पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, असा दावा करत इतर सर्व गुन्हे खोटे असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
राजकीय दबावया प्रकरणामागे मोठा राजकीय दबाव असून RSS आणि बजरंग दल यांसारख्या संघटनांचा यात हात असल्याचा खळबळजनक आरोप काझी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा द्या, पण माझ्या पुतण्याला यात नाहक गोवण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
प्रशासनाने न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
Web Summary : In the Nashik TCS case, suspects were presented in court and remanded to police custody. Relatives alleged a political conspiracy, claiming a love affair between the accused and victim and accusing RSS involvement. Tensions rose, prompting increased police security.
Web Summary : नाशिक टीसीएस मामले में आरोपियों को अदालत में पेश किया गया और पुलिस हिरासत में भेज दिया गया। रिश्तेदारों ने राजनीतिक साजिश का आरोप लगाया, आरोपी और पीड़ित के बीच प्रेम प्रसंग का दावा किया और आरएसएस की संलिप्तता का आरोप लगाया। तनाव बढ़ने पर पुलिस सुरक्षा बढ़ाई गई।