Join us
Daily Top 2Weekly Top 5

Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी

यंदाच्या IPL हंगामातील दुसरा शतकवीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 21:05 IST

Open in App

IPL 2026 MI vs PBKS Mumbai Indians Opener Quinton de Kock Century :  मुंबईतील वानखेडेच्या मैदानात हिटमॅन रोहित शर्माच्या जागी मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवताना क्विंटन डी कॉकनं मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पहिली अन् आपल्या IPL कारकिर्दीतील तिसरी सेंच्युरी झळकावली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात संजू सॅमसन याच्यानंतर शतक झळकवणारा तो दुसरा फलंदाज ठरला. पहिल्या चार सामन्यात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जोडीला सलामीवीराच्या रुपात रायन रिकल्टनला संधी देत त्याला बाकावर बसवले होते. पण संधी मिळताच त्याने आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश करत अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्सला मजबूत स्थितीत नेणारी खेळी केली.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॅटर आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळताना दिसला आहे. याआधी २०१२ मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसला होता. पण त्यानंतर यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा MI नं त्याला आपल्या संघात घेतलं. क्विंटन डी कॉक हा  आयपीएलमधील सर्वोत यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. २०१६ च्या हंगामात DC च्या संघाकडून त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाविरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना ५४ चेंडूत १०८ धावांची खेळी केली होती. २०२२ मध्ये लखनौच्या संघाकडून त्याने कोलकाता विरुद्ध ७० चेंडूत नाबाद १४० धावा केल्या होत्या. आता मुंबई इंडियन्सकडून पहिले शतक झळकावताना त्याने आयपीएलमध्ये तिसरे शतक आपल्या नावे केले आहे.

कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी

English
हिंदी सारांश
Web Title : Quinton de Kock Smashes Century After Being Benched in IPL!

Web Summary : Benched for four games, Quinton de Kock seized his opportunity, smashing a century at Wankhede for Mumbai Indians. Replacing Rohit Sharma, he showcased his batting prowess and became the second centurion this IPL season after Sanju Samson, stabilizing MI's innings.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सपंजाब किंग्सक्विन्टन डि कॉक