शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 07:31 IST

Women Reservation Bill: संसदेच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात महिला आरक्षण कायदा दुरुस्ती विधेयक (१३१वी घटनादुरुस्ती), परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयके मांडण्यात आली. या विधेयकावर लोकसभेत अत्यंत वादळी चर्चा झाली.

नवी दिल्ली- संसदेच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात महिला आरक्षण कायदा दुरुस्ती विधेयक (१३१वी घटनादुरुस्ती), परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयके मांडण्यात आली. या विधेयकावर लोकसभेत अत्यंत वादळी चर्चा झाली. महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने मांडलेल्या विधेयकांना राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर केंद्र सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची पुनर्रचना जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तीन विधेयकांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास त्याचा फायदा कोणत्याही एका पक्षाला नव्हे तर सर्व देशालाच होईल. महिला आरक्षणाच्या विषयाला ज्यांनी पूर्वी विरोध केला होता त्यांना महिलांनी माफ केले नाही. त्यांचा पुढील निवडणुकांमध्ये मोठा पराभव झाला.

लोकसभेत गुरुवारी सादर झालेल्या विधेयकांपैकी परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश (कायदे दुरुस्ती) विधेयक (ज्याद्वारे दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुधारित महिला आरक्षण कायदा लागू केला जाणार आहे) ही दोन विधेयकेही सभागृहात मांडण्यात आली. त्यापूर्वी सुमारे ४० मिनिटांच्या चर्चेनंतर ही विधेयके सादर करण्यात आली. लोकसभेची सदस्यसंख्या ८१५ पर्यंत वाढणार असून, त्यापैकी २७२ जागा महिलांसाठी राखीव असतील. महिला आरक्षणाचा निर्णय लागू केल्यामुळे ना पुरुषांना, ना कोणत्याही राज्याला नुकसान होणार नाही, असे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गुरुवारी सांगितले. 

मतदारसंघांच्या परिसीमनाबाबत देशाच्या पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण भागातील कोणत्याही राज्यावर अन्याय होऊ देणार नाही. आम्हाला काेणतेही श्रेय नकाेय. तुम्ही याचे श्रेय घ्या, ही माझी गॅरंटी आहे.- नरेंद्र माेदी, पंतप्रधान

दक्षिण भारतातील राज्यांत जागा १९५पर्यंत वाढणार : शाहदक्षिण भारतातील पाच राज्यांमधील लोकसभेच्या सध्या असलेल्या १२९ जागा १९५पर्यंत वाढतील, म्हणजेच सुमारे ५० टक्क्यांनी वाढ होईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, एकूण लोकसभा जागा ८१६पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. मात्र या संदर्भात काही जण चुकीची माहिती पसरवत असल्याचा त्यांनी आरोप केला.महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती आणि परिसीमन आयोग स्थापन करण्यासंदर्भातील तीन विधेयकांवरील चर्चेत हस्तक्षेप करताना शाह म्हणाले की, दक्षिणेतील पाच राज्यांतील लोकसभा जागा १२९ वरून १९५पर्यंत वाढतील. म्हणजे त्यांचे प्रतिनिधित्व २३.७६ टक्क्यांवरून २३.८७% वाढणार म्हणजे जवळपास २४% होईल. नवीन विधेयक संमत झाल्यावर लोकसभेच्या जागा कमाल ८५०पर्यंत जाऊ शकतात, मात्र हा फक्त अंदाजे आकडा असून प्रत्यक्षात त्या ८१६वर स्थिर राहतील.

परिसीमन जबरदस्तीने लादण्याचा केंद्राचा प्रयत्न : काँग्रेस नेते गौरव गोगोईलोकसभेत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी सांगितले की, केंद्र सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन ‘जबरदस्तीने लादण्याचा’ प्रयत्न करत आहे. तसेच, सरकार खरोखरच महिला आरक्षण लागू करण्यास कटिबद्ध असेल, तर ते लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांच्या आधारे तत्काळ लागू करावे. भाजप परिसीमनाचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे, जेणेकरून आपला प्रभाव वाढवता येईल. लोकसभेत गुरुवारी सादर झालेली तीनही विधेयके महिला, जातीय जनगणना, संविधान, संघराज्य रचनेच्या विरोधातील आहेत. केंद्र सरकारची ही कृती लाजिरवाणी असल्याची टीका गोगोई यांनी केली.

तीन विधेयकांवर लोकसभेत आज चार वाजता मतदानलोकसभेत महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती आणि परिसीमन आयोग स्थापन करण्यासंबंधी तीन विधेयकांवर आज, शुक्रवारी दुपारी चार वाजता मतदान होणार असल्याची माहिती त्या सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, या विधेयकांवर सुमारे १५ ते १८ तास चर्चा होणार आहे. 

३ विधेयके काेणती? त्यांचा उद्देश काय? सरकारची यामागे भूमिका काय अन् विराेधकांचा आक्षेप कशावर? महिला आरक्षणविषयक संविधान (१३१वी दुरुस्ती) विधेयक, २०२६मुख्य मुद्दे : हे संविधान दुरुस्ती विधेयक महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास लोकसभेची सदस्यसंख्या वाढवण्याचा प्रस्ताव मांडते. ३३% जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. ही अंमलबजावणी २०११च्या जनगणनेवर आधारित परिसीमनानंतर अपेक्षित आहे. सरकारचा युक्तिवाद : महिला प्रतिनिधित्व वाढवणे व समानता साध्य करणे, हा उद्देश आहे. कोणत्याही राज्याचे नुकसान होणार नाही, असा सरकारचा दावा आहे.विरोधकांचा आक्षेप : परिसीमनच्या नावाखाली राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न आणि आरक्षण लांबणीवर टाकण्याचा आरोप. परिसीमन विधेयक, २०२६मुख्य मुद्दे : हे विधेयक लोकसभा आणि राज्य विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग स्थापन करण्याशी संबंधित आहे. २०११च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल. लोकसंख्येच्या बदलानुसार जागांचे पुनर्वाटप होईल.सरकारचा युक्तिवाद : लोकसंख्येच्या बदलानुसार प्रतिनिधित्व अधिक न्याय्य करण्यास आवश्यक. महिला आरक्षण लागू करण्यास ही तांत्रिक प्रक्रिया अनिवार्य.विरोधकांचा आक्षेप : दक्षिण व काही प्रगत राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल, मोठ्या लोकसंख्येच्या काही राज्यांना फायदा होईल. राजकीय फायद्यासाठी बदल. केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२६मुख्य मुद्दे : हे विधेयक दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू - काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षण लागू करण्यासाठी कायदेशीर बदल करते. एकूण ३३ टक्के महिला आरक्षणाची तरतूद या प्रदेशांमध्ये लागू होणार आहे.सरकारचा युक्तिवाद : केंद्रशासित प्रदेशांमध्येही महिलांना समान राजकीय प्रतिनिधित्व मिळावे आणि देशभर समान धोरण लागू व्हावे, हा उद्देश.विरोधकांचा आक्षेप : हे विधेयक परिसीमन आणि संसद विस्ताराच्या मोठ्या राजकीय योजनेचा भाग असल्याचा आरोप. खरा हेतू महिला आरक्षण नसून राजकीय पुनर्रचना असल्याचे विरोधकांचे म्हणणे.

English
हिंदी सारांश
Web Title : Heated debate on bills; Modi urges no political color to reservation.

Web Summary : Parliament debated women's reservation, delimitation, and Union Territory bills. Modi urged bipartisan support. Opposition alleges forced constituency restructuring. Voting is scheduled today after extensive discussion.
टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद