शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 06:54 IST

Parthwada 'video scandal: परतवाड्याच्या अयान अहमद नामक नराधमाने स्वतःच्या ऐयाशीसाठी अल्पवयीन मुलींच्या आयुष्याची राखरांगाेळी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आता अमरावती शहरातील उच्चभ्रू वस्तीपर्यंत पोहोचली आहे.

अमरावती -  परतवाड्याच्या अयान अहमद नामक नराधमाने स्वतःच्या ऐयाशीसाठी अल्पवयीन मुलींच्या आयुष्याची राखरांगाेळी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आता अमरावती शहरातील उच्चभ्रू वस्तीपर्यंत पोहोचली आहे. मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्या जाळ्यात अनेक निष्पाप मुली भरडल्या गेल्या आहेत. अटकेत असलेल्या चार आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फ्लॅट ठरला ‘हनी ट्रॅप’  सर्वांत संतापजनक बाब म्हणजे अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील ‘हनी ट्रॅप’ ठरलेला एक फ्लॅट. आरोपी मानव  सुगंधे (२०) याने हा स्वत: भाड्याने घेतलेला फ्लॅट मुलींवर अत्याचार करण्यासाठी अयान अहमदला चक्क ‘तासिका तत्त्वावर’ भाड्याने दिला होता. अहमद (१९) याने त्या फ्लॅटमध्येच दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. तेथेच ते अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले. 

पोलिसांनी केक खाल्ला अन् भरवलाहीकाही पोलिसांनी आरोपी अयानचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. तर, परतवाडा ठाणेदारांनी पीडित मुलींची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची एसडीपीओ डॉ. शुभम कुमार यांच्यामार्फत चौकशी होणार आहे. त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा एसपी विशाल आनंद यांनी गुरुवारी दिला आहे. अयान हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याने सोशल मीडियाचा वापर सावज हेरण्यासाठी केला. ९० टक्के पीडितांना त्याने सोशल मीडियाद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अत्याचाराचा हा खेळ सहा महिन्यांपासून सुरू होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Paratwada 'Video Scandal' reaches elite, girls exploited in Amravati.

Web Summary : Amravati's Paratwada video scandal involved a flat rented hourly for exploitation. Ayan Ahmad lured girls via social media. Police negligence is under investigation; SP assures action.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती