शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार

By विलास बारी | Updated: April 17, 2026 05:46 IST

Crime News: जळगाव शहरातील एका महिला ग्राफिक डिझायनरची अघोरी विद्या आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांत फसवणूक झाल्याच्या प्रकाराला चार वर्षे उलटून गेले असले तरी, या गुन्ह्यातील दांपत्याला पोलिस पकडू शकलेले नाहीत.

जळगाव - शहरातील एका महिला ग्राफिक डिझायनरची अघोरी विद्या आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांत फसवणूक झाल्याच्या प्रकाराला चार वर्षे उलटून गेले असले तरी, या गुन्ह्यातील दांपत्याला पोलिस पकडू शकलेले नाहीत. यातील,  मुख्य संशयिताची पत्नी स्वतः पोलिस कर्मचारी असल्याने या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत संतप्त पीडितेने १६ एप्रिला अखेर पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली.

पीडित महिला आणि संशयित पोलिस कर्मचारी महिमा पाटील या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. पीडितेच्या घरातील वादाचा गैरफायदा घेत महिमाने तिचा पती ललित पाटील याच्याकडे 'दैवी शक्ती' असल्याचे सांगितले. घरातील संकटे दूर करण्याचे आश्वासन देत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिला अघोरी विद्येच्या जाळ्यात ओढल्याची तक्रार आहे.

अघोरी पुजा करुन उकळले पैसेभोंदू ललित पाटील याने पीडितेच्या मनात भीती निर्माण करून तिला उज्जैन, तनोट माता मंदिर आणि ओंकारेश्वर अशा ठिकाणी नेले. उज्जैन येथे स्मशानभूमीत अघोरी पूजा करून लाखो रुपये उकळले. पीडितेने कर्ज काढून दिलेले सुमारे ११ लाख रुपये परत मागितले असता, संशयिताने तिला कुटुंबाचा नाश करण्याची धमकी दिली. याप्रकरणी २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी फसवणुकीचा हा प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. संशयित महिला पोलिस कर्मचारी मुंबईत कार्यरत असूनही तिला अटक न झाल्याने 'खाकी'च संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. जळगाव पोलिसांनी अनेकदा मुंबई व ठाणे येथे छापे टाकले. मात्र, अद्यापही हे भोंदू दांपत्य पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव