IPL च्या यंदाच्या हंगामाची विजयासह सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला घरच्या वानखेडेच्या मैदानात सलग चौथ्या पराभवाची नामुष्की ओढावली. क्विंटन डी कॉकच नाबाद शतक आणि नमन धीरच्या अर्धशतकी खेळीशिवाय अन्य एकाही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी अपराजित पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ १९५ धावांवर अडखळला. या धावांचा बचाव करताना दोन वेळचा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराह पुन्हा विकेट लेस राहिला. याशिवाय त्याने प्रभसिमरन सिंगचा सोपा झेल टिपला. त्यामुळे वानखेडेच्या मैदानात एका बाजूला पंजाबसाठी प्रभसिमन सिंग नायक ठरला तर दुसऱ्या बाजूला त्याच्या खेळीला हातभार लावत जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्ससाठी खलनायक ठरला, असे चित्र पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहची चूक महागात पडली
मुंबई इंडियन्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना प्रियांश आर्यच्या रुपात अल्लाह मोहम्मद गझनफर याने पंजाबला पहिला धक्का दिला. चौथ्या षटकात हार्दिक पांड्याने प्रभसिमरन सिंगलाही फसवलेच होते. पण जसप्रीत बुमराहनं तो ११ धावांवर खेळत असताना त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर त्याने बुमराहसह मुंबई इंडियन्सच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. ३९ चेंडूत ८० धावांची नाबाद खेळ त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरनंही ६० धावांची जबरदस्त खेळी केली. जर बुमराहने त्याचा झेल टिपला असता तर मुंबई इंडियन्सला मॅचमध्ये येण्याची एक संधी नक्कीच निर्माण झाली असती. पण बुमराहनं चूक केली अन् ती MI साठी चांगलीच महागात पडली.
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
गोलंदाजीतही दिसली नाही धार...
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संयुक्तरित्या सर्वाधिक विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यापासून विकेटसाठी संघर्ष करताना दिसत आहे. याआधी जसप्रीत बुमराहवर एवढी वाईट वेळ कधीच आली नव्हती. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ४१ धावा खर्च करून तो विकेट लेस राहिला. सलग पाचव्या सामन्यात त्याची पाटी कोरी राहिली. त्याचा खराब फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
प्रभसिमरन सिंगचा विक्रमी डाव
जसप्रीत बुमराहनं हातभार लावलेल्या खेळीत प्रभसिमरन सिंगने खास विक्रमाला गवसणी घातली. वयाच्या २५ व्या वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा कऱमाऱ्या फलंदाजांच्या यादीत प्रभसिमरन सिंग अव्वलस्थानी पोहचला आहे. त्याने डेविड मिलरला मागे टाकत दहाव्यांदा अशी कामगिरी करून दाखवली आहे.
Web Summary : Mumbai Indians faced another home defeat against Punjab. Bumrah dropped Prabhsimran early, who then scored a match-winning knock. Despite De Kock's century, MI fell short, and Bumrah's wicketless spell continued, adding to Mumbai's woes.
Web Summary : मुंबई इंडियंस को पंजाब के खिलाफ घरेलू मैदान पर हार मिली। बुमराह ने प्रभसिमरन का कैच छोड़ा, जिन्होंने बाद में मैच जिताऊ पारी खेली। डी कॉक के शतक के बावजूद, मुंबई पीछे रह गई, और बुमराह का विकेट रहित प्रदर्शन जारी रहा।