शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 07:00 IST

Heat Wave In Maharashtra: राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

मुंबई - राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

अनेक भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ओआरएस घ्यावे, सैल कपडे वापरावेत. याशिवाय घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्री वापरावी. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व मुलांची काळजी घ्यावी. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत.

पावसाची हलकी सर, उष्णतेचीही बसणार झळमध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ ते २१ एप्रिलदरम्यान ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.१६ ते १८ एप्रिलदरम्यान राज्यात कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, १९ ते २२ एप्रिलदरम्यान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. 

साताऱ्यात माणमध्ये उष्माघाताचा बळी? सातारा शहरातील तापमानाची गुरुवारी ४१.२ अंशाची नोंद झाली असून, माण तालुक्यात एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी गेल्याचे सांगण्यात येते. हणुमंत काशीनाथ चव्हाण शेतात शेळ्या राखण्यासाठी गेले होते. त्यावेळी थकवा जाणवल्याने झाडाखाली बसले. पण, चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Heatwave Alert Across Maharashtra; Next 4 Days Critical, Warnings Issued

Web Summary : Maharashtra faces a severe heatwave. High temperatures and humid conditions are expected, especially in central Maharashtra, Marathwada, Vidarbha, and Konkan. Citizens are urged to take precautions, including hydration and avoiding midday sun exposure. Light rain expected in some regions. A farmer in Satara reportedly died from heatstroke.
टॅग्स :weatherहवामान अंदाजTemperatureतापमानMaharashtraमहाराष्ट्र