Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 08:45 IST

Open in App
1 / 12

भारतीय सुपरस्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या IPL 2026 मध्ये दमदार फलंदाजी करून वाहवा मिळवतो आहे. पण असे असतानाच तो वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

2 / 12

विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अवनीत कौरचा फोटो लाईक केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा एका मॉडेलचा फोटो लाईक केल्याने खळबळ उडाली आहे.

3 / 12

विराट कोहलीने जर्मन इन्फ्लुएंसर लिझलाझ (Lizzlazz) हिच्या इन्स्टाग्राम पोस्टला 'लाईक' केल्यामुळे सोशल मीडियावर या गोष्टीची तुफान चर्चा रंगल्याचे दिसत आहे.

4 / 12

विराटने केलेल्या या अनपेक्षित कृतीमुळे चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून, या पोस्टवरील लाईक्सचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 12

लिझलाझ (LizLaz) ही एक प्रसिद्ध जर्मन-दक्षिण आफ्रिकन सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, कंटेंट क्रिएटर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आणि अभिनेत्री-मॉडेल आहे.

6 / 12

लिझलाझ भारतीय संस्कृती, स्थानिक खाद्यपदार्थ आणि शहरांचे दर्शन घडवणारे व्हिडिओ बनवते. तिच्या आदरयुक्त दृष्टिकोनामुळे भारतीय चाहत्यांमध्ये ती प्रचंड लोकप्रिय आहे.

7 / 12

सोशल मीडियावर तिला बरेच लोक 'साडीमधील जर्मन मुलगी' (German Girl in Saree) म्हणून ओळखले जाते, कारण ती अनेकदा भारतीय पेहरावात दिसते.

8 / 12

लिझलाझ ही केवळ एक ब्लॉगर नसून तिने मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc. Psychology) मिळवली आहे. तसेच तिला गायनाचीही आवड आहे.

9 / 12

तिने आपल्या व्लॉग्समध्ये मुंबई, गोवा, दिल्ली आणि हरियाणा यांसारख्या शहरांमधील तिचे अनुभव अतिशय प्रांजळपणे मांडले आहेत आणि प्रवासवर्णनही केले आहे.

10 / 12

लिझलाझ सध्या सोल (दक्षिण कोरिया) येथे वास्तव्यास असून तिचे इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते.

11 / 12

तिने अनेक प्लॅटफॉर्मला मुलाखती दिल्या असून, भारत आणि जर्मनीमधील सांस्कृतिक फरकांवर आधारित ती एक पॉडकास्ट देखील चालवते. तोदेखील बराच लोकप्रिय आहे.

12 / 12

जरी ती सोशल मीडियावर 'लिझ' किंवा 'लिझलाझ' या नावाने प्रसिद्ध असली, तरी तिने तिचे खरे नाव अद्याप सार्वजनिक केलेले नाही. त्यामुळे तिला लिझलाझ नावानेच ओळखली जाते.

टॅग्स :विराट कोहलीव्हायरल फोटोज्सोशल मीडियासोशल व्हायरलइन्स्टाग्राम