Join us
Daily Top 2Weekly Top 5

Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:57 IST

Share Market: भारतीय शेअर बाजारातील आजच्या सत्राची सुरुवात अत्यंत संथ आणि चढ-उतारांनी भरलेली राहिली. जागतिक संकेत आणि कंपन्यांचे तिमाही निकाल या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

Share Market: भारतीय शेअर बाजारातील आजच्या सत्राची सुरुवात अत्यंत संथ आणि चढ-उतारांनी भरलेली राहिली. जागतिक संकेत आणि कंपन्यांचे तिमाही निकाल या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई (BSE) सेन्सेक्स ३४.४९ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७८,०२३.१७ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. दुसरीकडे, एनएसई (NSE) निफ्टी १७.१५ अंकांच्या घसरणीसह २४,१७९.६० च्या पातळीवर आला. बाजाराच्या कलानुसार, सुमारे १,६२८ शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे, तर ७३८ शेअर्समध्ये घसरण आणि १६८ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

तेजी आणि घसरणीतील प्रमुख शेअर्स

निफ्टीवर आज आयटीसी (ITC) आणि एनटीपीसी (NTPC) सारख्या शेअर्सनी आघाडी घेतली आहे. याशिवाय ट्रेंट, ओएनजीसी (ONGC) आणि अदानी एंटरप्राइजेसच्या शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून येत आहे. याउलट, आयटी (IT) क्षेत्रातील शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. विप्रो, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांसारखे दिग्गज शेअर्स आज घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत. त्यांच्यासोबतच एचडीएफसी लाईफ आणि टाटा कन्झ्युमरच्या शेअर्समध्येही विक्रीचा कल दिसून आला.

छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR

आज 'या' स्टॉक्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर

रेल विकास निगम (RVNL): भद्रक-विजयनगरम सेक्शन दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्यासाठी कंपनी सर्वात कमी बोली लावणारी (L1) कंपनी ठरली आहे. ₹९६७.९२ कोटींच्या या मोठ्या प्रकल्पामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

ॲक्सिस बँक (Axis Bank): बँकेचे बोर्ड २५ एप्रिल रोजी निधी उभारणीच्या पर्यायांवर विचार करणार आहे. याच दिवशी बँक आपले तिमाही आणि वार्षिक निकालही घोषित करणार आहे. बँकेच्या फंड उभारणीच्या योजनेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागलंय.

CESC: या वीज क्षेत्रातील कंपनीनं चार प्रमुख कंपन्यांसोबत 'विंड-सोलर हायब्रिड पॉवर' प्रकल्पांसाठी वीज खरेदी करार (PPA) साइन केलेत.

कल्याणी स्टील्स (Kalyani Steels): कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) बाल मुकुंद माहेश्वरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, तो ८ मे पासून प्रभावी होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Share Market Muted Start; Sensex Up, Nifty Down; ITC Shines

Web Summary : Indian share market started slow, with volatility. Sensex saw a marginal rise, while Nifty declined. ITC and Adani Enterprises shares performed well. RVNL secured a railway project bid. Axis Bank considers fundraising.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा