शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:24 IST

Raju Shetti Meet Harshwardhan Sapkal: या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Raju Shetti Meet Harshwardhan Sapkal: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उद्योगपतींना मात्र मोकळे रान करून दिले जात आहे. शक्तीपीठ महामार्गाची काहीही गरज नसताना व कोणीही त्याची मागणी केली नसताना केवळ लाडक्या उद्योगपतींना गडचिरोलीतील खजिन संपत्ती लुटून थेट गोव्याच्या समुद्री किनारी सुरळीत वाहतुक करता यावी यासाठी मध्य भारतातून गोव्यापर्यंत हा महामार्ग आखला आहे, या शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे असेही सपकाळ म्हणाले.

काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले, खर्च जास्त 

माजी खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले की, कोकणातील आंबा व काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून खर्च मात्र जास्त होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे. आंब्याच्या एका कलमाला वर्षाला ३८०० ते ४००० रुपये खर्च येतो, मजुराला दिवसाला ८०० रुपये द्यावे लागतात आणि सरकारने मात्र एका कलमाला फक्त २०० रुपये नुकसान भरपाई दिली आहे, ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. एनडीआरएफ मधून तसेच राज्य सरकारने भरीव मदत दिली पाहिजे, विमा कंपन्यांनीही नुकसान भरपाई दिली नाही. 

दरम्यान, कोकणातील शेतकऱ्याला भरीव मदत मिळावी यासाठी आंदोलन सुरू असून १८ तारखेला रत्नागिरीत पुढील आंदोलनासंदर्भात मेळावा होणार आहे. सरकारने भरीव मदत दिली नाही, तर मुंबईत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन केले जाईल. गिरगावपासून वर्षा बंगल्यावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. कोकणातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे तसा इतर पक्षांनीही द्यावा, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Raju Shetti Meets Sapkal: Congress Support for Konkan Farmers' Movement

Web Summary : Congress backs Swabhimani Shetkari Sanghatana's agitation for Konkan farmers facing losses due to global warming. Raju Shetti met Harshwardhan Sapkal, urging support. Congress opposes Shaktipith highway, favoring farmers over industrialists. Further protests are planned if adequate aid isn't provided.
टॅग्स :congressकाँग्रेसkonkanकोकणFarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ