By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:48 IST
1 / 6LIC Investment Scheme: देशातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी एलआयसी (LIC) वेळोवेळी आपल्या ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार नवनवीन पॉलिसी आणत असते. एलआयसीच्या अशाच एका फायदेशीर योजनेपैकी एक म्हणजे 'जीवन शिरोमणी' (Jeevan Shiromani Policy). ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना आपल्या कमाईची सुरक्षित गुंतवणूक करायची आहे आणि भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक सुरक्षेचं कवच तयार करायचंय.2 / 6एलआयसीच्या (Life Insurance Corporation-LIC) लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला फक्त ४ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये प्रीमिअमची रक्कम तुलनेत अधिक असते. जीवन शिरोमणी किमान एक कोटी रुपयांची विमा रक्कम देतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त विम्याच्या रकमेची कोणतीही मर्यादा नाही. जाणून घेऊ या योजनेत आणखी काय आहे खास.3 / 6जीवन शिरोमणी पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. यामध्ये, ४ वर्षांसाठी दरमहा ९४,००० रुपये जमा करावे लागतील. तुम्ही हा प्रीमियम दर महिन्याला, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा दरवर्षी जमा करू शकता.4 / 6या योजनेचा लाभ घेण्यासाठी, पॉलिसीधारकाचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. जर आपण जास्तीत जास्त वयाबद्दल बोललो तर, १४ वर्षां पर्यंतच्या पॉलिसी मुदतीसाठी कमाल वय ५५ वर्षे आहे, १६ वर्षांच्या मुदतीसाठी कमाल वय ५१ वर्षे, १८ वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय ४८ वर्षे आहे आणि २० वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय ४५ वर्षे आहे.5 / 6जीवन शिरोमणी हा एक मनी बॅक प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळतात. १४ वर्षांची योजना खरेदी केल्यास १० व्या आणि १२ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ३० टक्के, १६ वर्षांची पॉलिसी खरेदी केल्यावर १२ व्या आणि १४ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ३५ टक्के, १८ वर्षांची पॉलिसी खरेदी केल्यावर १४ व्या आणि १६ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ४० टक्के आणि २० वर्षांच्या मुदतीची पॉलिसी खरेदी केल्यावर १६ व्या आणि १८ व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या ४५ टक्के रक्कम मिळते. उर्वरित रक्कम मुदतपूर्तीनंतर एकरकमी दिली जाते.6 / 6या पॉलिसीच्या एक वर्षानंतर आणि एक वर्षाचा पूर्ण प्रीमियम भरल्यानंतर काही अटींसह कर्जाची सुविधाही दिली जाते. डेथ बेनिफिट्सही दिले जातात. पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या आधारे ग्राहक कर्ज घेऊ शकतात. वेळोवेळी ठरल्याप्रमाणे व्याजदरानं पॉलिसी लोन उपलब्ध होऊ शकतं. पॉलिसीधारकाला गंभीर आजार असल्याचं निदान झाल्यास त्यांना विम्याच्या रकमेच्या १० टक्के रक्कम एकरकमी दिली जाते. याशिवाय डेथ बेनिफिट्सचाही पॉलिसीमध्ये समावेश आहे. अधिक माहितीसाठी, आपण https://licindia.in / याची माहिती घेऊ शकता.