हिमाचलच्या सिरमौर जिल्ह्यातील एका बातमीने पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात दोन सख्या भावंडाशी लग्न करणाऱ्या महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. पिता होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना, दोन्ही भावंडांनी सोशल मीडियावर हृदयस्पर्शी पोस्ट लिहून छोट्या पाहुण्याचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, बाळाच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे
जुलै २०१५ मध्ये सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावातील प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन सख्ख्या भावांनी सुनीता नावाच्या तरुणीशी लग्न केले . एका तरुणीने दोन भावंडांशी विवाह केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. या लग्नामुळे समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या; काहींनी या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाद निर्माण केला होता.
वडिलांनी व्यक्त केला आनंद
लग्नानंतर दहा महिन्यांनी सुनीताने एका बाळाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी प्रदीप नेगी आणि कपिल नेगी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. जलसंपदा विभागात कार्यरत असलेले प्रदीप आणि परदेशात नोकरी करणारे कपिल यांनी या आगमनाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना, हा क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर भावूक पोस्ट
पिता झाल्याचे सुख अनुभवत असलेल्या या दोन्ही भावंडांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहित बाळाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आज आमच्या कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे; त्याने केवळ आमचे घरच नव्हे, तर आमची अंतःकरणेही असीम आनंदाने भरून टाकली आहेत. देवदेवतांच्या आणि आमच्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने, आज आम्हाला पालक होण्याचे भाग्य लाभले आहे. आमचे जग आता पूर्णपणे बदलून गेले आहे आणि या नव्या जबाबदारीसह पुढे जाण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत."
Web Summary : Himachal: Two brothers married one woman who gave birth. Both fathers expressed joy, welcoming the baby with heartfelt social media posts. The couple's unusual marriage had sparked debate. They are excited to embrace parenthood.
Web Summary : हिमाचल: दो भाइयों ने एक महिला से शादी की जिसने बच्चे को जन्म दिया। दोनों पिताओं ने खुशी व्यक्त करते हुए सोशल मीडिया पर हार्दिक पोस्ट के साथ बच्चे का स्वागत किया। दंपति की असामान्य शादी ने बहस छेड़ दी थी। वे पितृत्व को अपनाने के लिए उत्साहित हैं।