शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:03 IST

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवर संसदेत जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांना धारेवर धरले.

नवी दिल्ली - देशाच्या संसदेत रात्री उशिरापर्यंत महिला आरक्षण आणि सीमांकन विधेयकावर जोरदार चर्चा झाली. आज संध्याकाळी ४ वाजता महिला आरक्षणावर मतदान होणार आहे. त्यातच महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण अधिनियम २०२३ गुरुवारपासून लागू झाले. याबाबत केंद्रीय कायदे मंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केले आहे. परंतु संसदेत याच कायद्यातील सुधारणेबाबत चर्चा सुरू असताना १६ एप्रिलपासून लागू करण्याचं अधिसूचना का काढण्यात आली हे अद्याप स्पष्ट नाही.

अधिनियम लागू झाल्यानंतरही सध्याच्या लोकसभेत महिलांना याचा लाभ लगेच मिळू शकणार नाही. माहितीनुसार, महिलांसाठी असणारे आरक्षण पुढील जनगणनेच्या आधारे सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लागू केले जाईल. केंद्रीय कायदे मंत्रालयाने काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलंय की, संविधानातील १०६ वी दुरुस्ती अधिनियम २०२३ ची तरतूद १६ एप्रिल २०२६ पासून तात्काळ लागू होतील. सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम पारित करण्यात आले होते. जे महिला आरक्षण अधिनियम म्हणून ओळखले जाते.

यामुळे लोकसभा आणि राज्यातील विधानसभेत एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. हे आरक्षण २०२७ च्या जनगणनेनंतर होणाऱ्या सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू होऊ शकत नव्हते. सध्याच्या लोकसभेत ज्या ३ विधेयकांवर चर्चा होत आहे त्याचा उद्देश हे आरक्षण २०२९ पासून लागू करणे आहे. याआधी केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी महिला आरक्षण विधेयकावर शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता सभागृहात मतदान होईल. पंतप्रधानांनी सर्व खासदारांना महिला आरक्षणाला पाठिंबा देण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे कुठलीही शंका उपस्थित होण्याचं कारण नाही असं त्यांनी सांगितले.

महिला आरक्षणावर पंतप्रधान काय म्हणाले?

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवर संसदेत जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांना धारेवर धरले. ज्या कोणी महिलांच्या निवडणूक लढवण्याच्या हक्काला विरोध केला, त्यांची दुर्दशा झाली आहे. या गोष्टीला राजकीय तराजूत तोलू नका. आज एकत्र बसून, एकाच दिशेने विचार करण्याची आणि खुल्या मनाने विकसित भारताच्या क्षमतेला स्वीकारण्याची संधी आहे. संपूर्ण देश विशेषतः महिला आपल्या निर्णयांवर लक्ष ठेवून असतील, पण त्याहूनही अधिक, त्या आपल्या हेतूंवर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे देशातील महिला आपल्या हेतूंमधील कोणतीही त्रुटी कधीही माफ करणार नाहीत असं मोदींनी विरोधकांना टोला लगावला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Women's Reservation Act 2023 Implemented Amid Parliament Debate: Notification Released

Web Summary : The Women's Reservation Act 2023, reserving 33% of seats in parliament for women, has been implemented. While discussions continue, the law takes effect April 16, 2026, after delimitation following the next census. The current Lok Sabha won't immediately benefit.
टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी