शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:46 IST

या कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून,याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे  ७ कोटी रुपये असल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे.

सावंतवाडी :  दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या किंमतीची ब्लू व्हेल माशाची उलटी म्हणजेच ‘अंबरग्रीस’ची बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाच्या पथकाने उलथून लावत मुद्देमाल सह  चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई गुरूवारी सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे वनविभागाकडून करण्यात आली असून  रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला . या कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून,याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे  ७ कोटी रुपये असल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे.​शिरोडा परिसरात काही व्यक्तीकडे अंबरग्रीसची असल्याची माहिती वनविभागाला लागली होती त्यामुळे वनविभागाकडून कुडाळ वनविभागातील एक कर्मचारी ग्राहक म्हणून तयार करून पाठवला होता हा ग्राहक संशयित आरोपी कडे जाऊन  ब्लू व्हेल प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) आपण विकत घेणार असून आपणास योग्य किंमत सांगा असे सांगून त्यांच्याशी चर्चा केली व त्याना विक्रीस प्रवृत्त केले.त्यानंतर वनविभागाच्या फिरते पथकाने सापळा रचत उलटीची विक्री करत असतना चौघांना ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये रणजित रामचंद्र नायर, (४० रा. परबगाव शिरोडा), गुरुनाथ नाईक  (७० वर्षे रा. परबगाव शिरोडा), विभव आडारकर, (३५ वर्षे, रा. शिरोडा ता. वेंगुर्ला) आणि निलेश मनोहर पांडजी ( ३३ वर्षे, रा. रेडी. ता. वेंगुर्ला) यांचा समावेश असून त्यांना रितसर अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान आरोपींकडून ९.१२० कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आलेल आहे.  अंबरग्रीस आरोपी १ ते ४ यांना सुमारे ७ कोटी रुपये किंमतीचे असून त्याची विक्री करावयाची होती. ब्लू व्हेल माशाची उलटीस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी व किंमत असल्याने पैशांच्या लोभापायी अशा स्वरूपाचे वनगुन्हे सध्या उघडकीस येत आहेत. असे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.ही कारवाई सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा याच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनअधिकारी संजय वाघमोडे सहाय्यकवनसंरक्षक. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यात फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे वनक्षेत्रपाल अमित कटके, वनपाल सावळा कांबळे, वनपाल  महेश पाटील,  ब्रम्हकुमार भोजने,  संग्राम पाटील, अनिकेत माने, वनरक्षक माणगाव, श्री रविंद्र पाटील, वनरक्षक फिरते पथक,  रिषीका होले,  नितीन सावंत, चालक वनविभाग यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹7 Crore Whale Vomit Seized in Sindhudurg; Four Arrested

Web Summary : Forest officials in Shiroda, Sindhudurg, seized ₹7 crore worth of ambergris (whale vomit) and arrested four individuals attempting to sell it illegally. The 9.12 kg substance was discovered after an undercover operation.
टॅग्स :Fishermanमच्छीमारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी