नाशिकच्या टीसीएस बीपीओमधील कथित धर्मांतर प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात पीडित असलेल्या एका पुरुष कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात टीम लीडर्सच्या टोळीने कशा प्रकारे छळ केला, याची सविस्तर माहिती दिली आहे. केवळ हिंदू देवी-देवतांचा अपमान करणेच नव्हे, तर आजारी वडिलांना बरे करण्याचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे पीडिताने म्हटले आहे.
वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा
पीडित कर्मचाऱ्याने सांगितले की, "मार्च २०२३ मध्ये माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता. मी मानसिक तणावात असताना तौसीफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख आणि रजा मेमन यांनी मला गाठले. 'हिंदू धर्मात दोष आहेत, तू आमचा धर्म स्वीकारला तरच तुझे वडील ठीक होतील,' असे सांगून त्यांनी माझ्यावर दबाव आणला." इतकेच नाही तर कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मला काळ्या जादूचा सल्लाही दिला होता, असा आरोप पीडिताने केला आहे.
बळजबरीने नमाज टोपी अन् मांसाहार
पीडिताने पुढे सांगितले की, एकदा ईदच्या दिवशी त्याला घरी बोलावून बळजबरीने नमाजची टोपी घालण्यास भाग पाडले. त्याचा फोटो काढून एका ग्रुपमध्ये पाठवण्यात आला. तसेच, तो शाकाहारी असतानाही त्याला हॉटेलमध्ये नेऊन मांसाहार करण्यासाठी आणि नमाज पठण करण्यासाठी धमकावण्यात आले. जेव्हा त्याने या गोष्टींना नकार दिला, तेव्हा त्याच्या कामाचे रिपोर्ट खराब करण्यात आले.
पत्नी आणि महिला सहकाऱ्यांबद्दल अश्लील वक्तव्ये
सर्वात धक्कादायक म्हणजे, जेव्हा पीडिताने सांगितले की त्याच्या पत्नीला अपत्यप्राप्तीसाठी अडचणी येत आहेत, तेव्हा तौसीफने अत्यंत अश्लील आणि संतापजनक टिप्पणी केली. त्यावरून झालेल्या वादात तौसीफने पीडिताच्या अंगावर टेबल फॅन फेकून मारला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ऑफिसमधील इतर महिला सहकाऱ्यांबद्दलही हे आरोपी अश्लील शेरेबाजी करत असत, असेही तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी रचला होता सापळा
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नाशिक पोलिसांनी अतिशय गुप्तपणे काम केले. महिला पोलिसांना हाऊसकीपिंग स्टाफ बनवून ऑफिसमध्ये तैनात करण्यात आले होते. त्यांनी तिथे होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि पुरावे गोळा केले. याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून निदा खान नावाची महिला आरोपी अद्याप फरार आहे.
Web Summary : TCS Nashik employee alleges religious conversion pressure, abuse by leaders. They exploited his father's illness, forced religious practices, and made lewd comments about his wife and female colleagues. Police investigation led to arrests; one suspect remains at large.
Web Summary : टीसीएस नाशिक के कर्मचारी ने धार्मिक धर्मांतरण के दबाव और नेताओं द्वारा दुर्व्यवहार का आरोप लगाया। उन्होंने उसके पिता की बीमारी का फायदा उठाया, धार्मिक प्रथाओं को मजबूर किया, और उसकी पत्नी और महिला सहकर्मियों के बारे में अश्लील टिप्पणियां कीं। पुलिस जांच में गिरफ्तारियां; एक संदिग्ध अभी भी फरार है।