Helicopter Crash In Indonesia : इंडोनेशियामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. २४ तासांपूर्वी हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला होता. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरील एका व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्याचे दिसत आहे. हे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले. सरकारने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोर्नियो बेटावरील पाम तेलाच्या मळ्यांवरून उडत असताना हा अपघात घडला. रडार संपर्क तुटल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
हे हेलिकॉप्टर एअरबस एच 130 होते. ते पीटी मॅथ्यू एअर नुसंताराच्या मालकीचे होते. ते हेलिकॉप्टर कोठे जात होते, हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही.
हेलिकॉप्टर क्रॅश कसे झाले?
हेलिकॉप्टरला उड्डाण घेण्यासाठी ४५ मिनिटे लागली. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी तयार असतानाच त्यात बिघाड झाला, पण वैमानिकांनी ते उडवणे सुरूच ठेवले. पाच मिनिटांनंतर, हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला, यामुळे ते कोसळले.
सेकाडाऊ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक झैनल अबिदिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले तो परिसर डोंगराळ आहे, त्यामुळे बचाव आणि मदतकार्य करणे अवघड झाले आहे. असे असूनही, त्यांनी आठ मृतदेहांची ओळख पटवली आहे. त्यापैकी सात जण इंडोनेशियन आहेत. मृतांपैकी एकाची ओळख मलेशियाचा नागरिक म्हणून पटली आहे.
Web Summary : A helicopter crashed in Indonesia, killing all eight people on board. The helicopter lost radar contact 24 hours prior. The wreckage of the PT Matthew Air Nusantara-owned Airbus H130 was found in a jungle area after flying from palm oil fields. Search and rescue operations are complete.
Web Summary : इंडोनेशिया में एक हेलीकॉप्टर दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें सवार सभी आठ लोगों की मौत हो गई। हेलीकॉप्टर का 24 घंटे पहले रडार से संपर्क टूट गया था। पाम तेल के खेतों से उड़ान भरने के बाद पीटी मैथ्यू एयर नुसंतारा के स्वामित्व वाले एयरबस एच130 का मलबा एक जंगल में मिला। खोज और बचाव अभियान पूरा हो गया है।