शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:11 IST

चोकाक येथील पुलाखाली खून

हातकणंगले : चोकाक (ता. हातकणंगले) येथील कोल्हापूर-सांगली राज्य मार्गाच्या पुलाखाली गुरुवारी सायंकाळी ७ वाजता मोबाईल खरेदीच्या पैशावरून सचिन ऊर्फ लालू सर्जेराव मुसळे (वय ३४, रा. अतिग्रे ता. हातकणंगले) या तरुणाचा त्याचा मित्र तुषार ऊर्फ पप्पू रवींद्र लोहार (३५ रा. चोकाक) या संशयिताने दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून खून केला. रात्री उशिरा हातकणंगले पोलिस ठाण्यात या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सचिन मुसळे हा एमआयडीसीमध्ये ठेकेदार म्हणून काम करीत होता. तुषार ऊर्फ पप्पू लोहार याच्याबरोबर सचिनची मैत्री होती. गेल्या दोन दिवसांपासून दोघांमध्ये मोबाईलच्या पैशावरुन वाद सुरू होता.गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दोघे चोकाक येथील रस्त्याच्या पुलाखाली दारू पित बसले होते. यावेळी दोघात पैशावरुन वाद झाला. दारुच्या नशेत तुषार लोहारने सचिन मुसळेच्या डोक्यात दगड घातला. घाव वर्मी लागल्याने तो बेशुद्ध पडला. 

पुलाचे काम सुरू असल्याने येथील कामगारांनी पोलीस ठाण्यात घडल्या प्रकराची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर जखमी सचिन मुसळेला सी.पी.आर. रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले. डोक्यात गंभीर दुखापत होत रक्तस्त्राव झाल्याने दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. संशयित आरोपी तुषार लोहारच्या शोधासाठी हातकणंगले पोलिसाची टिम रवाना झाली आहे. 

मृत सचिनच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख आप्पासाहेब जाधव, जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. या खुनाचा गुन्हा रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Friend kills friend over mobile money dispute in drunken rage.

Web Summary : In Chokak, a man was murdered by his friend due to a dispute over mobile phone money while intoxicated. The accused struck the victim's head with a stone, resulting in his death. Police are searching for the suspect.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर