शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:05 IST

गुजरातमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.

भारतीय जनता पार्टीने त्यांचा राजकीय बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये विजयाचा आणखी एक विक्रम रचला आहे. भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ७०० हून अधिक जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे मोठा रेकॉर्ड बनला आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या (आप) ४०० हून अधिक उमेदवारांनी अवघ्या चार तासांत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपा उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगर परिषद, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९ हजार ९९२ जागांच्या निवडणुकीची घोषणा केली. २६ एप्रिल रोजी या जागांवर मतदान होणार आहे. अर्जाची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ७२४ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता ९ हजार २३७ जागांसाठी मतदान पार पडेल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने त्यांचा करिष्मा दाखवला. नगरपालिकांमध्ये ४८ जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध आले. काडी नगरपालिकेत निवडणुकीआधीच पक्षाला दोन तृतीयांश बहुमतही मिळाले. त्याशिवाय ८ अन्य नगरपालिकांमध्ये भाजपाला निर्विवाद सत्ता मिळणार आहे. यात बायद, गंदेवी, शेहरा नगरपालिकांचा समावेश आहे.

तालुका पंचायतीत एकूण २६० पैकी ६ ठिकाणी भाजपाला निवडणुकीपूर्वीच बहुमत मिळाले आहे. ज्या ९ नवीन नगर पंचायती आहेत तिथे भाजपाचे ४०  उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात ११ पोर बंदर, १२ आणंद आणि ५ मेहसाणा येथील आहेत. वडोदरा आणि अहमदाबाद नगर पालिकेतही प्रत्येकी २ ठिकाणी भाजपा उमेदवार निवडून आलेत. 

अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गोंधळ 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वडोदरा, सूरत, मेहसाणा आणि बनासकांठा येथे हायव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तहसिलदार, प्रांत कार्यालयात ३ तासांत मोठा गोंधळ उडाला. मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहचले होते. या प्रकारामुळे काँग्रेस आणि आपने भाजपावर घोडेबाजाराचा आरोप केला. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांमध्ये संघर्षाची स्थिती उद्भवली परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 

सेमीफायनलमध्ये भाजपाची मोठी झेप

गुजरातमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे भाजपा, काँग्रेससोबत आम आदमी पार्टीकडूनही या निवडणुकीत ताकद पणाला लावली. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याही अनेक सभा पार पडल्या. मात्र बिनविरोध निवडणुकीच्या पॅटर्नमध्ये भाजपाने यंदा मोठी झेप घेतली आहे. २०१५ च्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाचे केवळ ३७ उमेदवार बिनविरोध जिंकले होते. २०२१ मध्ये ही संख्या २२० इतकी झाली. परंतु यावेळी हा आकडा ७०० च्या पार गेला. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपा, काँग्रेस आणि आपचे २५ हजार ५१६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarat: BJP's Unopposed Victory Record Before Elections; Congress, AAP Suffer

Web Summary : BJP secured over 700 unopposed wins in Gujarat's local body elections, a new record. Congress and AAP candidates withdrew, paving BJP's path to victory. Elections are seen as a 2027 assembly poll semi-final.
टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप