नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकातील एका सामन्याबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्पर्धेतील ३१ व्या सामन्यात, जो कॅनडा आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता, त्यामध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला आहे. कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने प्रदर्शित केलेल्या एका खळबळजनक डॉक्युमेंट्रीनंतर आसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.
कॅनडाच्या राष्ट्रीय प्रसारक वाहिनीने करप्शन, क्राईम आणि क्रिकेट नावाची एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली. या डॉक्युमेंट्रीमध्ये कॅनडा क्रिकेटमधील अंतर्गत भ्रष्टाचार, खेळाडूंच्या निवडीतील अनियमितता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयसीसीच्या नियमांचे झालेले उल्लंघन उघड करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या अहवालानुसार, आयसीसीने आता अधिकृतपणे चौकशीचा फास आवळला आहे.
कॅनडा कर्णधाराच्या षटकात भ्रष्टचार
आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कॅनडाच्या क्रिकेटशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू केली. टी-२० विश्वचषकातील ३१ व्या सामन्यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणातील सर्वात मुख्य संशय न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील ५ व्या षटकावर व्यक्त केला जात आहे. कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याने टाकलेल्या पाचव्या षटकाची चौकशी केली जाणार आहे. या षटकात त्याने एक 'नो बॉल', एक 'वाईड बॉल' टाकला आणि एकूण १५ धावा दिल्या. या सामन्यात एकीकडे फिरकी गोलंदाज साद बिन जफर याने मेडन ओव्हर टाकून विकेट मिळवली होती, तर दुसरीकडे जसकरण सिंग, डिलन हेलीगर आणि खुद्द कर्णधार बाजवा यांची षटके कमालीची महागडी ठरली होती.
क्रिकेट विश्वात खळबळ
विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर फिक्सिंगचा संशय व्यक्त होणे ही क्रिकेटसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. आयसीसी या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि फोन कॉल्सची पडताळणी करत असून, दोषी आढळल्यास संबंधित खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
Web Summary : ICC probes alleged match-fixing in the Canada-New Zealand T20 World Cup game following a documentary exposing cricket corruption. Suspicion centers on a costly over bowled by Canada's captain, prompting a thorough investigation into potential rule violations and phone records.
Web Summary : कनाडा-न्यूजीलैंड टी20 विश्व कप मैच में फिक्सिंग के संदेह पर आईसीसी की जांच। एक वृत्तचित्र के बाद क्रिकेट भ्रष्टाचार उजागर हुआ। कनाडा के कप्तान के एक महंगे ओवर पर संदेह केंद्रित है, जिससे संभावित नियमों के उल्लंघन की जांच हो रही है।