पश्चिम आशियात दोन युद्ध भूमींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एक होर्मुझ सामुद्रधुनी आणि दुसरी लेबनान. आधी इराण आणि अमेरिकेमध्ये शस्त्रसंधी झाली. त्यानंतर इस्रायल आणि लेबनानमध्ये शस्त्रसंधी झाली. पण, त्यानंतरही इराण-अमेरिकायुद्धाची भाषा करू लागले आहेत. अमेरिकेने पश्चिम आशियामध्ये १० हजार नौदलाचे जवान पाठवले आहेत. तर इराणही अमेरिकेसोबत लढण्याचा इशारा देत आहे. त्यामुळे युद्ध पुन्हा पेटणार की, काय याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे युद्धाबद्दलची भूमिका बदलताना तयार दिसत नाही. दुसरीकडे हिजबुल्लाह आता माघार नाही, अशा भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम अमेरिका आणि इराणच्या भूमिकांवरही होणार, असेच चित्र आहे. त्यामुळे इराण-अमेरिकेचा प्लॅन काय आहे, दोन्ही देश युद्धाची तयारी करत आहेत की, आणखी दुसरा मार्ग निवडणार आहेत?
दोन्ही देशांकडून जहाजे आणि शस्त्र सज्जता
अमेरिका आणि इराणचा गाडा होर्मुझ सामुद्रधुनीवरून अडकला आहे. इराण होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देत आहेत. अशात अमेरिकेकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. सध्या दोन्हीही देश आपापली जहाजे आणि शस्त्र सज्जता पूर्ण करु लागले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकन नौदलाच्या हालचाली वाढल्यानंतर इराण अलर्ट मोडवर आहे.
अमेरिकेने १० हजार सैनिक पाठवले
इराणसोबत चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने अचानक पश्चिम आशियामध्ये १० हजार अतिरिक्त जवान पाठवले आहेत. यात बहुतांश जवान हे हवाई दलाचे आणि नौदलाचे आहेत. अमेरिकेने या निर्णयाबद्दल म्हटले आहे की, सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. जेणेकरून अमेरिकेचे मित्र देश हे सुरक्षित राहावेत. पण, इराणकडून या हालचालींचे अर्थ वेगळे लावले जात आहेत.
इराणच्या एका अधिकाऱ्यांनी स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितले की, अमेरिका आधीच पराभूत झाली आहे आणि आता फक्त देखावा करत आहे. या जवानांना होर्मुझ सामुद्रधुनी आणि लेबनानमध्ये तैनात केले जाणार आहे. यामुळे तणाव आणखी वाढणार आहे.
अमेरिकेने आतापर्यंत थेट हल्ला करण्याची हिंमत केलेली नाही. मित्रराष्ट्राच्या माध्यमातून हल्ले करत आहे. आमच्या मिसाईल्स आणि ड्रोन्स इतके शक्तिशाली आहेत की, त्यामुळे अमेरिकेला एका मोठ्या युद्धात पडायचे नाहीये. इराण आपली संरक्षण करण्यासाठी सक्षम असून, आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असेही इराणने म्हटले आहे.
Web Summary : Despite ceasefires in the region, US-Iran tensions escalate. America deploys troops, while Iran warns of retaliation, fueling war fears. Both nations bolster naval presence near Hormuz Strait.
Web Summary : क्षेत्र में युद्धविराम के बावजूद, अमेरिका-ईरान तनाव बढ़ रहा है। अमेरिका सैनिकों की तैनाती करता है, जबकि ईरान जवाबी कार्रवाई की चेतावनी देता है, जिससे युद्ध का डर बढ़ रहा है। दोनों देश होर्मुज जलडमरूमध्य के पास नौसेना की उपस्थिति को मजबूत करते हैं।