शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:44 IST

1 / 10
पाकिस्ताननं तेल आणि गॅस उत्पादनाच्या दिशेने मोठं यश मिळवलं आहे. पाकिस्तानने आपल्या सर्वात मोठ्या तेल विहिरीतून व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. बारागजाई X-०१ या विहिरीमुळे पाकिस्तानला इंधनासाठी परदेशी स्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
2 / 10
जर पाकिस्तानच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर काळ्या सोन्याचा हा खजिना त्याला श्रीमंत बनवू शकतो. पाकिस्तानसाठी ही वेळ महत्त्वपूर्ण आहे कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे असं तज्ज्ञांनी सांगितले. अरब न्यूजच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने बुधवारी आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या तेल आणि गॅस साठ्यातून उत्पादन सुरू केले. बारागजाई एक्स-०१ मुळे वार्षिक ३२९ मिलियन डॉलर्स परकीय चलनाची बचत होऊ शकेल, ज्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळेल.
3 / 10
खैबर पख्तुनख्वा (KP) मधील कोहाट जिल्ह्यातील नश्पा ब्लॉकमध्ये असलेली बारागजाई X-01 विहीर सध्या दररोज सुमारे १५ हजार बॅरल तेल (bpd) आणि ४५ मिलियन स्टँडर्ड क्यूबिक फूट गॅस आणि १५ मेट्रिक टन लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) चे उत्पादन करत आहे.
4 / 10
सुरुवातीला या विहिरीतून दररोज ५,३०० बॅरल तेल आणि १७ मिलियन MMSCFD वायूचे उत्पादन होत होते. भविष्यात उत्पादन वाढून दररोज २५,००० बॅरल तेल आणि ६० MMSCFD गॅसपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. या वाढलेल्या उत्पादनामुळे ही विहीर पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पादन करणारी विहीर ठरेल.
5 / 10
बारागजाई X-०१ ही पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पादन देणारी विहीर आहे. चाचणी आणि पूर्तता टप्पा पूर्ण केल्यानंतर आम्ही यशस्वीपणे उत्पादन सुरू केले आहे. या प्रकल्पामुळे देशाला आणि तेथील लोकांना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे असं ऑयल अँन्ड गॅस डेवल्पमेंट कंपनीने म्हटलं आहे.
6 / 10
ऑयल आणि गॅस डेवल्पमेंट कंपनीने (OGDC) जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, बारागजाई एक्स-०१ ही आता OGDC च्या पोर्टफोलिओमधील तसेच पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पादन देणारी विहीर बनत आहे. पाकिस्तानच्या एकूण कच्च्या तेलाच्या उत्पादनात तिचा वाटा अंदाजे १० टक्के आहे.
7 / 10
चाचणी आणि पूर्तता टप्पा पूर्ण केल्यानंतर कंपनीने या विहिरीतून उत्पादन यशस्वीपणे सुरू केले आहे. ओडीजीसी ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी अन्वेषण आणि उत्पादन कंपनी आहे. कंपनीने केलेले शोध पाच वेगवेगळ्या भूवैज्ञानिक रचनांमध्ये पसरलेले आहेत. कठीण भूवैज्ञानिक परिस्थितीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते विकसित करण्यात आले आहे.
8 / 10
या प्रकल्पामुळे महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. अंदाजित दैनिक महसूल १५६ मिलियन पाकिस्तानी रुपये (५६०,००० डॉलर) असेल तर मासिक महसूल ४.७ अब्ज रुपये (१६.९ मिलियन डॉलर) असेल. वार्षिक महसूल ५७ अब्ज रुपये किंवा २०४.७ मिलियन डॉलर असण्याचा अंदाज आहे असं कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.
9 / 10
यामुळे आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी होईल, परिणामी वार्षिक ३२९ मिलियन अमेरिकी डॉलर्सची परकीय चलन बचत होईल. आम्ही विक्रमी वेळेत ८ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकली असून गॅस प्रक्रिया आणि कच्च्या तेलाच्या साठवणुकीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत असाही कंपनीने दावा केला आहे.
10 / 10
पाकिस्तान आपल्या ऊर्जा पुरवठ्यासाठी परदेशी स्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. देशाच्या आयात बिलामध्ये तेल आणि गॅसचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे परकीय चलन साठ्यावर लक्षणीय दबाव येतो. म्हणून परकीय चलनावरील ताण कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी पाकिस्तानकरिता तेल उत्पादन अत्यंत महत्त्वाचे आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrude Oilखनिज तेल