नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बीपीओशी संबंधित धर्मांतर आणि छळाचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. याप्रकरणी पोलीस तपास वेगाने सुरू असून संशयित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी केली जात आहे. या खात्यांमध्ये बाहेरील सोर्सडून फंडिंग आलं असावं असा संशय तपास यंत्रणांना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत ७ पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे, तर निदा खान नावाची महिला अद्याप फरार आहे. याच दरम्यान निदा खानच्या कुटुंबाने समोर येऊन सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
'इंडिया टुडे टीव्ही'शी बोलताना निदा खानच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीवर लावलेले सर्व आरोप खोटे असून हे संपूर्ण प्रकरण दुसऱ्या एखाद्या मुद्द्याला दाबण्यासाठी रचलं गेलं आहे. त्यांनी दावा केला की, निदाचा तक्रारदाराशी कोणताही थेट संबंध नव्हता. "सर्व काही बनावट आहे आणि भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण दाबण्यासाठी आमच्या मुलीला यात अडकवलं जात आहे" असे त्यांनी म्हटलं.
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
"ती फक्त १५-१६ हजार कमावते"
निदाच्या वडिलांशिवाय तिच्या काकांनी आणि आईनेही इंडिया टुडेकडे आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, "आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला बदनाम केलं जात आहे. आमची मुलगी कोणतीही एचआर (HR) नाही, ती फक्त १५-१६ हजार रुपये कमावते."
"आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
कुटुंबीयांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या मुलीने कधीही कोणावर धर्मांतरासाठी दबाव आणला नाही किंवा इतर कोणत्याही धर्माच्या देव-देवतांविरुद्ध भाष्य केलेलं नाही. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, निदा खान सध्या भिवंडीत आपल्या सासरी असून ती प्रेग्नेंट आहे. या संपूर्ण वादामुळे कुटुंब मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त आहे. या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असून विनाकारण त्यांच्या मुलीला टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
"निदा कुटुंबाचा आधार बनली"
स्वतःची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचं सांगत कुटुंबीयांनी म्हटलं की, निदा नोकरी करून कुटुंबाला आधार देत होती. आमचं कुटुंब सर्व धर्मांचा आदर करतं आणि या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
दुसरीकडे, पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे सुरू असून सर्व पैलू लक्षात घेतले जात आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून बँक खात्यांच्या चौकशीद्वारे 'फंडिंग'चा अँगलही तपासला जात आहे. सध्या हे प्रकरण सतत नवीन वळण घेत असून तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येईल.
Web Summary : Nida Khan's family refutes allegations in the TCS conversion case, claiming she's framed to suppress the Ashok Kharat matter. They deny her involvement, stating she earns little and supports her family. Police investigate financial angles and search for Khan.
Web Summary : निदा खान के परिवार ने टीसीएस धर्मांतरण मामले में आरोपों का खंडन किया और दावा किया कि अशोक खरात मामले को दबाने के लिए उन्हें फंसाया गया है। उन्होंने उनकी संलिप्तता से इनकार किया, यह कहते हुए कि वह कम कमाती है और अपने परिवार का समर्थन करती है। पुलिस वित्तीय कोणों की जांच कर रही है और खान की तलाश कर रही है।