शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:41 IST

कर्मचाऱ्यांवर नमाज पठणासाठी आणि सक्तीने मांसाहार करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये निदा सक्रिय होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. यामध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सार आणि शाहरुख शेख यांच्यासह एका महिलेचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. निदा खान ही एकमेव आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

नाशिकमधील टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेसमधील (TCS) धर्मांतर आणि धर्मांतरासाठी मुस्लिमेतर कर्मचाऱ्यांचा अतोनात छळ करणारे रॅकेट उघड झाल्यानंतर, देशातील संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्रातच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठे संकेत दिले. "नाशिकमधील हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.  यासंदर्भात आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहोत. या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आम्ही करणार आहो," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते पश्चिम बंगालमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले फडणवीस? -यावेळी, एका पत्रकारने देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या धर्मांतरण घटनेसंदर्भात सरकारची भूमिका आणि कारवाई संदर्भात प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, "नाशिकमधील हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहोत. एका मॉड्यूल अंतर्गत हे सर्व करण्यात आले आहे. कंपनीनेही यात मोठी भूमिका घेतली आहे. कुणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका टीसीएसने घेतली आहे. टीसीएसच्या प्रमुखांनीही या प्रकरणाची निंदा केली आहे." एवढेच नाही तर, "या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आम्ही करू. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांची मदतही यात घेतली जाईल." असे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खान फरार? -TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मास्टर माइंड निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची चर्चा असून ती महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, निदाच्या काही नातलगांनी यासंदर्भात २-३ वकिलांशी चर्चा केल्याचेही समजते. निदा खानच्या तपासासाठी ३ पथके प्रत्येकी गुजरात, केरळ आणि काश्मीरात रवाना झाली आहेत. तत्पूर्वी, ती भिवंडीत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सापडली नाही.

याशिवाय, मुंबई येथेही तिचे लोकेशन शोधण्यात आल्याचे समजते. निदा खान ही या प्रकरणातील मास्टर माइंड असून तिने कंपनीतील विशिष्ट धर्मांतील तरुणींना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तिच्या पुणे येथील घराचीही झडती घेण्यात आली आहे.

धर्मांतरासाठी दबाव -कर्मचाऱ्यांवर नमाज पठणासाठी आणि सक्तीने मांसाहार करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये निदा सक्रिय होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. यामध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सार आणि शाहरुख शेख यांच्यासह एका महिलेचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. निदा खान ही एकमेव आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Conversion Racket: Fadnavis Orders Probe, Hints at Wider Network

Web Summary : Fadnavis assures strict action in Nashik TCS conversion case. Investigation will uncover the module's reach, with central agencies' help if needed. Mastermind Nida Khan is absconding; teams search for her in multiple states.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालMuslimमुस्लीमHinduहिंदूTataटाटाPoliceपोलिस