आनंद फक्त खेळात सहभागी झाल्यानेच मिळत नाही, तर इतरांना आनंदी पाहण्यातूनही मिळतो असं म्हणतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सर्वांच्या काळजाला भिडणारा हा व्हिडीओ आहे. लोक भावुक झाले आहेत. एक लहान मुलगी जिला दोन्ही हात नसल्याने ती इतरांसोबत खेळू शकत नाही, आपल्या मित्र-मैत्रिणींना खेळताना पाहून ती इतकी आनंदी आहे की, तिच्या स्मितहास्याने इंटरनेटवर सर्वांची मनं जिंकली आहेत.
'दीवा चौधरी' नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने हा अत्यंत भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, एक चिमुकली पायऱ्यांजवळ शांतपणे बसली आहे. तिच्या समोर दोन मुलं मस्ती करत आहेत, धावत आहेत आणि आपापसात खेळत आहेत. ती मुलगी स्वतः त्यांच्यासोबत धावू शकत नाही, पण तिच्या डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील हसू सांगत आहे की, ती मनाने त्याच खेळाचा भाग आहे.
दुःख विसरून निवडलं हास्य
अनेकदा आपण छोट्या-छोट्या संकटात खचून जातो, पण ही मुलगी आपल्याला जगण्याची खरी पद्धत शिकवत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तिने फक्त बसून त्यांना खेळताना पाहिलं आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत हसत राहिली. तिने स्वतःचं दुःख बाजूला सारलं आणि इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधला. हे दृश्य इतके हृदयस्पर्शी आहे की, ते पाहून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील.
सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव
हा व्हिडीओ अपलोड होताच वेगाने व्हायरल झाला. लोकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकजण या मुलीच्या धैर्याचं आणि तिच्या निरागस हास्याचं कौतुक करत आहे. एका युजरने लिहिलं, "या व्हिडिओने मला खूप भावुक केलं." तर दुसऱ्या युजरने तिला "स्ट्रॉन्ग गर्ल" म्हणजेच एक कणखर मुलगी म्हटलं आहे. अनेकजण देवाकडे तिच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करत आहेत.
Web Summary : A moving video shows a girl without hands finding joy watching her friends play. Her radiant smile and resilience have touched hearts online, teaching a valuable lesson about happiness in shared moments. Despite her challenges, she chooses joy.
Web Summary : एक मार्मिक वीडियो में एक लड़की अपने दोस्तों को खेलते हुए देखकर खुशी पाती है। उसकी मुस्कान और लचीलापन ने ऑनलाइन लोगों के दिलों को छू लिया है, और साझा पलों में खुशी के बारे में एक मूल्यवान सबक सिखाया है। चुनौतियों के बावजूद, वह आनंद चुनती है।