शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:40 IST

Bank of Maharashtra Singrauli Bank Robbery: बँक ऑफ महाराष्ट्रवर ३५ लाखांचा सशस्त्र दरोडा; मॅनेजरवर हल्ला, हवेत फायरिंग.

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील बैढन परिसरात शुक्रवारी दुपारी एका थरारक बँक दरोड्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या शाखेत ५ सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून केवळ १५ ते २० मिनिटांत ३५ लाख रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी बँकेत फायरिंग केली आणि विरोध करणाऱ्या बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केला. 

दुपारी १२:५० च्या सुमारास, जेव्हा बँकेत ग्राहकांची वर्दळ होती, तेव्हा दोन चेहरा लपविलेले तरुण आत शिरले. त्यांच्या मागोमाग इतर तीन साथीदार हातात पिस्तूल आणि शस्त्रे घेऊन आले. बँकेत शिरताच दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. जेव्हा शाखा व्यवस्थापकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना शस्त्राच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली.

अवघ्या २० मिनिटांत दरोडेखोरांनी कॅश काऊंटर आणि तिजोरीतील ३५ लाख रुपये बॅगेत भरले. जाताना त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्रणालीचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केला. दरोडा टाकल्यानंतर सर्व आरोपी दुचाकीवरून जंगलाच्या दिशेने पसार झाले.

पोलीस यंत्रणा अलर्टवरघटनेची माहिती मिळताच सिंगरौली पोलीस अधीक्षक आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. संपूर्ण जिल्ह्याची नाकेबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. "आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल," असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिंगरौलीचे पोलीस अधीक्षक मनीष खत्री यांनी घटनास्थळी भेट दिली असून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दरोडेखोर हेल्मेटमध्ये तर इतर चार उघड्या तोंडाने दिसत आहेत. पोलिसांनी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्या असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

हवेत फायरिंगदरोडेखोरांनी ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना 'गन पॉइंट'वर घेतले. कोणाचेही धाडस होऊ नये म्हणून त्यांनी बँकेत आणि बाहेर हवेत गोळीबार केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Daylight Robbery at Bank of Maharashtra: ₹3.5 Million Looted

Web Summary : In Singrauli, Madhya Pradesh, five armed robbers stormed a Bank of Maharashtra branch, looting ₹3.5 million and gold within 20 minutes. They assaulted the manager and fired shots, creating terror. Police have sealed the district and launched a search operation. Investigations are ongoing to apprehend the perpetrators.
टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रRobberyचोरी