शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:15 IST

Russia Cuba Oil Supply : ७ लाख बॅरल तेलाची मदत पाठवून रशियाने अमेरिकेला दिला मोठा संदेश.

व्हेनेझुएलावर कारवाई करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाची ऊर्जा नाकेबंदी केलेली आहे. इराणनंतर क्युबाचा नंबर लागणार असेही ट्रम्प धमकी देत आहेत. अशातच अमेरिकेच्या धमक्यांना झुगारून रशियाने सात लाख बॅरल तेलाचा पुरवठा केला आहे. 

क्युबाला गेले तीन महिने कुठूनच कच्चे तेल मिळालेले नाही. क्युबाला व्हेनेझुएला कच्चे तेल पुरवत होता. परंतू, अमेरिकेने व्हेनेझुएलावर कारवाई करत राष्ट्राध्यक्ष मादुरोंना ताब्यात घेत व्हेनेझुएलाचा तेल बाजारावरच कब्जा केला होता. यामुळे क्युबाला देखील तेल मिळणे अशक्यप्राय झाले होते. शियाने क्युबाला सात लाख बॅरल तेलाचा पुरवठा केला असून, या मदतीमुळे क्युबाचा ऊर्जा संकट अंशतः दूर होण्यास मदत झाली आहे. भारतात क्युबाचे राजदूत जुआन कार्लोस एगुइलेरा यांनी रशियाच्या या कृतीचे स्वागत करत, "हा जगाला एक मोठा संदेश आहे," असे म्हटले आहे. 

राजदूत एगुइलेरा यांचे महत्त्वाचे विधाननवी दिल्लीत दिलेल्या मुलाखतीत राजदूत एगुइलेरा म्हणाले की, "तीन महिन्यांपासून तेलाचा थेंबही मिळाला नव्हता त्या क्युबाच्या किनाऱ्यावर  रशियन जहाज पोहोचले आहे. हे केवळ तेल नव्हते, तर रशिया संकटाच्या काळात क्युबाच्या पाठीशी उभा राहील, असा जगाला दिलेला संदेश होता." अमेरिकेने क्युबाला तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्याची किंवा संबंधित देशांवर जादा टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती, तरीही रशियाने हे धाडस दाखवले आहे.

व्हेनेझुएलाचे सहकार्य थांबले३ जानेवारी रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर, व्हेनेझुएलातून होणारा तेल पुरवठा पूर्णपणे बंद झाला. अमेरिकेच्या दबावामुळे मेक्सिकोनेही क्युबाला होणारा तेल पुरवठा थांबवला आहे. क्युबामधील सुमारे १.१ कोटी लोकसंख्येला सध्या भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे.

रशिया आणि चीनची भूमिकारशियाचे परराष्ट्र मंत्री सॅर्गेई लावरोव यांनी जाहीर केले आहे की, रशिया क्युबाला इंधन आणि मानवी मदत पुरवणे सुरूच ठेवेल. विशेष म्हणजे, चीन दौऱ्यावर असताना लावरोव यांनी स्पष्ट केले की, या सहकार्यात चीन देखील महत्त्वाची भूमिका बजावेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia Defies Trump, Delivers Oil to Cuba Amidst Energy Crisis

Web Summary : Russia shipped 700,000 barrels of oil to Cuba, defying US sanctions. Cuba faced a fuel crisis after Venezuela's supply halted due to US action. Russia's move, hailed by Cuba, sends a message of support during hardship. China may also assist.
टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिका