Sonali Raut on Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. सध्या घरात फिनाले विक सुरू असून घराला टॉप ५ सदस्य मिळाले आहेत. लवकरच या सीझनचा विजेता घोषित होणार आहे. सहावं पर्व सुरू झालं होतं, तेव्हा घरात तब्बल १७ सदस्यांनी एन्ट्री घेतलेली. आता घरात फक्त ५ सदस्य उरलेत. घरात आलेल्या सदस्यांमध्ये 'बिग बॉस हिंदी'करुन आलेल्या मराठमोळ्या मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या सोनाली राऊत हिचाही समावेश होता. पण, सोनाली सुरुवातीलाच घराबाहेर पडली. आता याच सोनाली राऊतनं सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच 'बिग बॉस मराठी'वर गंभीर आरोप केले आहेत.
सोनालीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "रिअॅलिटी टीव्ही म्हणजे आपल्या जीवाशी खेळ करणं नसावं. मी मोठ्या विश्वासाने या घरात प्रवेश केला होता, पण मला मानवी मर्यादांपलीकडे ढकलण्यात आलं. स्वयंपाकघरात उंदीर आणि झुरळांसोबत राहावं लागलं. तो अनुभव अक्षरशः भयावह होता. अत्यंत अस्वच्छ परिस्थितीमुळे मला 'स्केबीज' (Scabies) सारखा त्वचारोग झाला. आता जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे".
सोनालीने घराच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की, "ग्लॅमरच्या मागे उपासमार, झोपेचा अभाव आणि अस्वच्छता दडलेली आहे. इतकंच नाही तर, मला टॉवेल आणि अगदी रेझरसारख्या मूलभूत गोष्टीही इतरांसोबत शेअर करण्यास भाग पाडलं गेलं. कुणालाही करिअर आणि आरोग्य यापैकी एक निवडण्याची वेळ येऊ नये".
सोनालीने म्हटलं की, "स्वयंपाकघरात उंदीर फिरत होते, अन्न खाल्लं जात होतं आणि तेच अन्न स्पर्धकांना दिलं जात होतं. जेवणातून झुरळं बाहेर येत होती. शिक्षा म्हणून १७ स्पर्धकांसाठी फक्त एकच बाथरूम होतं. बाथरूममध्ये लोक धूम्रपान करत, तिथेच जेवण, चिकन, अंड्यांची टरफलं, कचरा आणि मृत उंदीरही पडलेले असायचे. कमतरतेमुळे स्पर्धक एकमेकांचे टॉवेल, नॅपकिन आणि बेडशीट वापरत होते. फक्त १७ स्पर्धकांसाठी मर्यादित टूथब्रश आणि रेझर उपलब्ध करुन दिली होती. योग्य अन्न, झोप आणि स्वच्छतेचा पूर्ण अभाव होता".
Web Summary : Sonali Raut criticized Bigg Boss Marathi for unhygienic conditions, citing rodents, cockroaches, and shared personal items. She contracted scabies due to the environment, highlighting the lack of cleanliness, inadequate food, and sleep deprivation faced by contestants.
Web Summary : सोनाली राउत ने बिग बॉस मराठी पर अस्वच्छ परिस्थितियों का आरोप लगाया, चूहों, तिलचट्टों और साझा निजी वस्तुओं का हवाला दिया। उन्हें वातावरण के कारण खाज हो गई, जिसमें स्वच्छता की कमी, अपर्याप्त भोजन और प्रतियोगियों द्वारा सामना की जाने वाली नींद की कमी पर प्रकाश डाला गया।