शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:38 IST

राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात करताना स्वतःबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या एका मिश्किल विधानाने हा हशा पिकला.

संसदेत महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकावर (१३१ वे संविधान दुरुस्ती विधेयक) चर्चा सुरू असताना आज शुक्रवारी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचे भाषण झाले. दरम्यान एक असा प्रसंग घडला की, लोकसभेत एकच हशा पिकला. राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात करताना स्वतःबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या एका मिश्किल विधानाने हा हशा पिकला.

संसदेत नेमकं काय घडलं? -राहुल गांधी भाषणासाठी उभे राहीले, तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्या हाताला झालेल्या दुखापतीसंदर्भात विचारले. राहुल यांनी काही इजा झाल्याचे सांगितले आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली. महिलांच्या योगदानासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "आई, बहीण, पत्नी अशा इतरही विविध रूपांत महिलांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. मात्र, पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही." हे ऐकताच सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. राहुल पुढे म्हणाले, पत्नीच्या संदर्भातील अनुभव तर आपल्याकडे नाही. मात्र, इतर रूपांतील महिलांनी आपल्याला अत्यंत प्रभावित केले आहे.

प्रियंका गांधी आणि इंदिरा गांधींसंदर्भात काय म्हणाले? -प्रियंका गांधींचे कौतुक करताना राहुल गांधी म्हणाले, जे मी २० वर्षांत करू शकलो नाही ते प्रियंकाने काल पाच मिनिटांच्या भाषणात करून दाखवले. गृहमंत्री अमित शाह यांच्या चेहऱ्यावरही हसू आले. तसेच आजी इंदिरा गांधींनी आपल्याला भीतीशी लढायला आणि सत्य-अहिंसेचा पाठ शिकवल्याचेही ते म्हणाले.

"संपूर्ण विरोधीपक्ष विधेयकाच्या विरोधात" -राहुल गांधी पुढे म्हणाले, "या विधेयकाचा महिला सक्षमीकरणाशी कोणताही संबंध नाही. हे विधेयक ओबीसी, एससी आणि एसटी बांधवांच्या विरोधात असून त्यांचे अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे," असा आरोप त्यांनी केला. महिलांच्या मागे लपून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा घाट घातला जात असून, संपूर्ण विरोधीपक्ष या विधेयकाच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.

राहुल गांधी लोकसभा भाषण २०२६, महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक, राहुल गांधी पत्नी विधान हशा, प्रियंका गांधी संसद भाषण कौतुक, Rahul Gandhi Lok Sabha Speech 2026, Rahul Gandhi Wife Remark Parliament, Women's Reservation Bill Opposition, Rahul Gandhi on Priyanka Gandhi,

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's 'no wife' remark triggers laughter in Parliament.

Web Summary : Rahul Gandhi's remark about not having a wife, during a parliamentary debate on women's reservation, caused laughter. He praised Priyanka Gandhi and spoke about his grandmother, Indira Gandhi. He also opposed the bill, alleging it disempowers OBC, SC, and ST communities.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदlok sabhaलोकसभा