शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:24 IST

अमेरिकेने होर्मुजच्या सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीतून पाकिस्तानचे 'शलामार' जहाज यशस्वीपणे बाहेर पडले आहे.

जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्ग समजल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीत सध्या युद्धसदृश परिस्थिती आहे. अमेरिकेने या मार्गावर कडक नाकेबंदी लागू केली असतानाच, पाकिस्तानच्या एका अजस्त्र तेल टँकरने हा वेढा यशस्वीपणे ओलांडला आहे. 'शलामार' असे या जहाजाचे नाव असून, अमेरिकन नौदलाच्या डोळ्यांदेखत या जहाजाने घेतलेली झेप सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

१४० वरून थेट ९ वर!

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरून जहाजांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिथे रोज १४० जहाजे ये-जा करायची, तिथे आता ही संख्या १० च्या खाली आली आहे. भीतीपोटी मागील तीन दिवसांत तब्बल १४ जहाजांनी आपला मार्ग बदलून माघार घेतली. मात्र, पाकिस्तान नॅशनल शिपिंग कंपनीचे 'शलामार' हे जहाज याला अपवाद ठरले.

नेमकं कसं निसटलं 'शलामार'?

'शलामार' हे अफ्रामॅक्स श्रेणीतील विशाल टँकर आहे. गेल्या रविवारी हे जहाज आखतीत शिरले होते, तेव्हा नाकेबंदी इतकी कडक नव्हती. मात्र, सोमवारी अमेरिकेने वेढा आवळताच इतर जहाजांनी थांबण्याचा निर्णय घेतला. अशावेळी गुरुवारी इराणच्या 'लारक' बेटाच्या दक्षिण भागातून शलामारने आपली वाट काढत बाहेर पडण्यात यश मिळवले. सूत्रांच्या माहितीनुसार, इराणने काही पाकिस्तानी जहाजांना विशेष परवानगी दिली असावी, म्हणूनच हे शक्य झाले.

पाकिस्तानात रविवारी दिवाळी!

हे जहाज संयुक्त अरब अमिरातीच्या 'दास आयलंड'वरून तब्बल ४ लाख ५० हजार बॅरल कच्चे तेल घेऊन निघाले आहे. हे जहाज सध्या कराचीच्या दिशेने झेपावत असून रविवारी ते बंदरात नांगर टाकेल. पाकिस्तानातील ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर या तेलाचे आगमन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

इराणची कोंडी, अमेरिकेची नजर

एकीकडे पाकिस्तानचे जहाज बाहेर पडले असले, तरी इराणची मात्र मोठी कोंडी झाली आहे. मार्च महिन्यापर्यंत इराण दिवसाला १७ लाख बॅरल तेल निर्यात करत होता, जे आता जवळपास शून्यावर आले आहे. ओमानच्या किनाऱ्यापासून ते थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेपर्यंत अमेरिकन नौदलाने नकाशा आखून हा समुद्र रोखून धरला आहे. आता अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची नवी फेरी सुरू होणार की हा तणाव आणखी वाढणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Ship Brazenly Breaches US Blockade in Hormuz Strait

Web Summary : Amidst heightened tensions in the Hormuz Strait, a Pakistani oil tanker, 'Shalamar,' successfully navigated through a US blockade. While many ships retreated, 'Shalamar' transported oil from the UAE to Karachi, offering relief amid Pakistan's energy shortage. The incident highlights the US-Iran tensions in the region.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराण