१९ मे २०२६ रोजी येणारी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2026) ही केवळ सोने खरेदीसाठी नाही, तर भाग्योदय करणाऱ्या 'अक्षय्य' उपक्रमांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. यंदा या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात तुळशीचे रोप लावणे हे सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे.
हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा
अक्षय्य तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा दिवस. या दिवशी केलेले दान, जप आणि सत्कर्म आपल्याला अनंत पटीने फळ देते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करण्यासाठी 'तुळशी'ची लागवड करणे हे सर्वोत्तम मानले गेले आहे.
तुळशीचे रोपच का लावावे?
तुळशीला 'हरिप्रिया' म्हटले जाते, म्हणजेच ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात हिरवीगार आणि प्रसन्न तुळस असते, तिथे माता लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुमच्याकडे 'रामा' तुळस (हिरवी पाने) असो वा 'श्यामा' (जांभळट पाने), दोन्हीचे आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व सारखेच आहे.
तुळशी रोपण: आवश्यक साहित्य आणि तयारी
साहित्य: नवीन तुळशीचे रोप, माती, शेणखत, नवीन कुंडी, पाणी, दिवा, फुले.
नियम: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर (ब्रह्म मुहूर्तावर) उठून स्नान करावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य देऊन पूजेचा संकल्प करावा.
हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा
तुळशी लावण्याचा शास्त्रोक्त विधी
१. कुंडीची तयारी: नवीन कुंडीमध्ये थोडी माती आणि नैसर्गिक शेणखत मिसळून वाफ तयार करा.२. मंत्रजाप: रोप लावताना मनात "ओम नमो भगवते वासुदेवाय" किंवा भगवान विष्णूच्या कोणत्याही मंत्राचा जप करत राहा.३. रुजवण: मातीमध्ये खड्डा करून तुळशीचे रोप अलगद लावा आणि त्याला पाणी घाला.४. नामकरण आणि पूजा: रोपण झाल्यानंतर तुळशीमातेसमोर तुपाचा दिवा लावा.५. विशेष मंत्र: पूजेदरम्यान "ओम श्री तुलसीदेवी नमः" या मंत्राचा ११ किंवा २१ वेळा जप करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
महत्त्वाचे नियम आणि काळजी
तुळशीचे केवळ रोपण करून चालत नाही, तर तिची जोपासना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे:
नित्य सेवा: तुळशीला दररोज सकाळी पाणी अर्पण करावे आणि सायंकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा.
स्वच्छता: तुळशीच्या कुंडीच्या आसपास नेहमी स्वच्छता ठेवावी.
सात्विकता: तुळशीजवळ चपला किंवा कचरा ठेवू नये.
Web Summary : Planting Tulsi on Akshaya Tritiya 2026 brings prosperity and spiritual growth. Tulsi, dear to Lord Vishnu, invites Lakshmi's blessings. Follow the rituals: prepare the pot, chant mantras, plant carefully, and offer light. Daily care ensures continued blessings and positivity.
Web Summary : अक्षय तृतीया 2026 पर तुलसी का पौधा लगाने से समृद्धि और आध्यात्मिक विकास होता है। तुलसी, भगवान विष्णु को प्रिय है, लक्ष्मी का आशीर्वाद लाती है। अनुष्ठानों का पालन करें: गमला तैयार करें, मंत्रों का जाप करें, सावधानीपूर्वक पौधा लगाएं और प्रकाश अर्पित करें। दैनिक देखभाल से निरंतर आशीर्वाद और सकारात्मकता सुनिश्चित होती है।