Peyush Bansal On Lenskart Grooming Policy: लेन्सकार्टचे (Lenskart) संस्थापक पियुष बन्सल यांनी सोशल मीडियावर कंपनीच्या 'ग्रूमिंग पॉलिसी'मधील भाषेची चूक मान्य केली आहे. कर्मचाऱ्यांना टिकली किंवा गंध लावण्याची परवानगी नाही, परंतु हिजाब आणि पगडी यांसारख्या गोष्टींना परवानगी आहे, असं नमूद केलेलंपत्रक जुनं असल्याचं पियुष बन्सल यांनी म्हटलंय.
हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा 'लेन्सकार्ट स्टाफ युनिफॉर्म आणि ग्रूमिंग गाईड' नावाचं एक पत्रक ऑनलाइन व्हायरल झालं. यात म्हटलं होतं की टिकली आणि गंध लावण्यास परवानगी नाही, तर कर्मचाऱ्यांना काळ्या रंगाची पगडी आणि हिजाब घालण्याची परवानगी होती. स्टाईल गाईडच्या दुसऱ्या एका आवृत्तीवर २ फेब्रुवारी २०२६ ही तारीख होती, ज्यामध्ये कपाळावर कुंकू लावण्यावर आणि हातातील कलावा धागा दिसण्यावरही बंदी घालण्यात आली होती.
पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण
बन्सल यांनी स्पष्ट केले की, कंपनीनं गेल्या काही वर्षांत ग्रूमिंग पॉलिसीमध्ये अनेकदा बदल केले आहेत आणि सध्या ऑनलाइन फिरत असलेली आवृत्ती जुनी आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली. "आमच्या पॉलिसीमध्ये टिकली आणि गंधासह कोणत्याही धार्मिक पेहरावावर कोणतीही बंदी नाही आणि आम्ही आमच्या मार्गदर्शक तत्त्वांना नियमितपणे समीक्षा करत असतो." व्हायरल होत असलेलं पत्रक कंपनीच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर
भाषेची की धोरणाची चूक?
एक कंपनी म्हणून आम्ही सतत शिकत पुढे जात आहोत, असं बन्सल यांनी म्हटलं. आमच्या भाषेमध्ये किंवा धोरणामध्ये जी काही चूक झाली आहे किंवा भविष्यात होईल, ती सुधारली जाईल. या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गैरसमज आणि चिंतेबद्दल आम्ही माफी मागतो, असंही त्यांनी पुढे नमूद केलं. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, ते पत्रक एक जुना अंतर्गत दस्तऐवज होता, अधिकृत एचआर पॉलिसी नव्हती. त्यात टिकली आणि गंध न लावण्याचा चुकीचा उल्लेख होता, जो मार्गदर्शक तत्त्वांचा भाग नसायला हवा होता.
बन्सल यांनी सांगितले की, या समस्येची ओळख अंतर्गत पातळीवर १७ फेब्रुवारी रोजीच पटली होती; हा विषय सार्वजनिक रित्या चर्चेत येण्यापूर्वीच आम्ही ते पत्रक हटवलं होतं.
बन्सल यांनी स्वीकारली जबाबदारी
"मला हे पूर्णपणे स्पष्ट करायचं आहे की, लेन्सकार्ट कोणत्याही प्रकारच्या सन्मानजनक धार्मिक पेहरावावर बंदी घालत नाही आणि कधीही घालणार नाही. यामध्ये टिकली, गंध किंवा श्रद्धेशी संबंधित इतर प्रतीकांचा समावेश आहे," असं बन्सल पुढे म्हणाले.
संस्थापक आणि सीईओ या नात्यानं ही चूक आधीच ओळखून ती दुरुस्त करायला हवी होती, असं म्हणत त्यांनी या चुकीची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आता त्यांच्या टीमला असे सर्व अंतर्गत दस्तऐवज अधिक कडक पुनरावलोकन प्रक्रियेतून पाठवण्याचे निर्देश दिले आहेत आणि भविष्यात ते स्वतः यावर लक्ष ठेवतील, असंही सांगितलं आहे.
Web Summary : Peyush Bansal addressed the Lenskart dress code controversy, clarifying an outdated policy incorrectly restricted religious symbols like Tilak and Bindi. He affirmed the current policy allows all religious expressions and has taken responsibility for the error.
Web Summary : पीयूष बंसल ने लेंसकार्ट के ड्रेस कोड विवाद को संबोधित करते हुए स्पष्ट किया कि पुरानी नीति में तिलक और बिंदी जैसे धार्मिक प्रतीकों पर गलत तरीके से प्रतिबंध लगाया गया था. उन्होंने पुष्टि की कि वर्तमान नीति सभी धार्मिक अभिव्यक्तियों की अनुमति देती है और त्रुटि की जिम्मेदारी ली है।