Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण

Hardik Pandya Jasprit Bumrah Mumbai Indians IPL 2026: मुंबई इंडियन्सचा सलग चौथ्या सामन्यात झाला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:47 IST

Open in App

Hardik Pandya Jasprit Bumrah Mumbai Indians IPL 2026: मुंबई इंडियन्सचा संघ सध्या वाईट फॉर्ममधून जात आहे. त्याचदरम्यान संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणाबाबत सुरु असलेल्या चर्चांमुळे तणाव नक्कीच वाढणार असल्याचे बोलले जात आहे. पंजाब किंग्सकडून झालेल्या दारुण पराभवानंतर, मैदानातील तणाव सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे कर्णधार हार्दिक पांड्या आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात काहीतरी बिनसले आहे का?, अशी चर्चा सुरू झाली आहे. सामन्यादरम्यान या दोन खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमकही झाल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे संघात सारंकाही आलबेल नसल्याचा चाहत्यांना संशय येऊ लागला आहे.

हार्दिक पांड्या - जसप्रीत बुमराहमध्ये वाद?

पाच सामन्यांत सलग चौथ्या पराभवाने पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पंजाबविरुद्ध १९६ धावांचा बचाव करताना मुंबईच्या गोलंदाजांची फारच वाईट अवस्था झाली. पण संघाच्या पराभवापेक्षाही, बुमराह आणि हार्दिक यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, जसप्रीत बुमराह कर्णधार हार्दिक पांड्याच्या एका निर्णयावर प्रचंड संतापलेला दिसत आहे. सामन्याच्या एका महत्त्वाच्या क्षणी, हार्दिकने बुमराहचा सल्ला धुडकावून लावत स्वतःच्या रणनीतीनुसार क्षेत्ररक्षण सेट केले. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसते की, बुमराह सुरुवातीला कर्णधाराशी वाद घालतो, पण नंतर निराश होऊन विषयच सोडून देतो. बुमराहच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून तो कर्णधाराच्या निर्णयावर नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. पाहा व्हायरल व्हिडीओ-

सामन्यानंतर हार्दिकची संघातील वरिष्ठ खेळाडूंवर टीका

सामन्यानंतर हार्दिक पांड्या प्रचंड संतापला होता. त्याने संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आणि संघात मोठे बदल करून कठोर निर्णय घेण्याची गरज भासू शकते हे स्पष्ट केले. हार्दिक म्हणाला, "आजच्या पराभवानंतर माझ्याकडे सध्या बोलण्यासारखं काही नाही. आम्हाला नीट पाहावं लागेल की आम्ही कुठे चुकतोय? त्रुटी नेमक्या कुठे आहेत? आजची वैयक्तिक चूक होती, सांघिक कमतरता होती की नियोजनातील अपयश होतं? हे पाहावे लागेल. आम्हाला लवकरच कठोर निर्णय घेत संघात बदल करावे लागू शकतील."

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Hardik and Bumrah clash during live match, video sparks debate.

Web Summary : Mumbai Indians' struggles continue, fueling dressing room tension rumors. A viral video suggests a rift between Hardik Pandya and Jasprit Bumrah during a match, raising doubts among fans about team harmony. Hardik hinted at potential team changes after the loss.
टॅग्स :आयपीएल २०२६सोशल व्हायरलसोशल मीडियाहार्दिक पांड्याजसप्रित बुमराहव्हायरल व्हिडिओ