Amravati Paratwada Scandal: अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे अमरावतीसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. परतवाडा व्हिडीओ प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मात्र आता मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांचे अभय आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आरोपी अयानचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून त्यात पोलीस कर्मचारीच त्याला केक भरवताना दिसत आहेत.
परतवाडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार अयान अहमद याचे चक्क पोलिसांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध उघड झाले आहेत. एका व्हायरल व्हिडीओनुसार आरोपी अयानने भररस्त्यात केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनीच त्याला प्रेमाने केक भरवल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, मुख्य आरोपी अयान अहमद याने 'BOSS' असं मोठ्या अक्षरात लिहिलेले टी-शर्ट घातले होते आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भररस्त्यात फटाक्यांची आतिषबाजी करत त्याने केक कापला. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी तिथे केवळ उपस्थितच नव्हते, तर त्यांनी मोठ्या आनंदाने अयानला केक भरवून शुभेच्छाही दिल्या. ज्या आरोपीने अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्या नराधमासोबत पोलिसांची ही मैत्री पाहून पोलीस दलासह सर्वांनाच धक्का बसला आहे.
'कमल रेसिडेन्सी'चा तो फ्लॅट होता अत्याचाराचा अड्डा
तपासातून समोर आले आहे की, अमरावती शहरातील कटोरा नाका परिसरातील कमल रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटला अयानने आपला अड्डा बनवले होते. तिसऱ्या मजल्यावरील या फ्लॅटमध्ये १८ ते १९ वर्षांच्या मुलींचा रात्रंदिवस राबता असायचा. इमारतीतील इतर रहिवाशांनी या संशयास्पद हालचालींबाबत फ्लॅट मालकिणीकडे तक्रारही केली होती, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. याच ठिकाणी बसून अयान मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असे आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवत असे.
Web Summary : Amravati's prime accused in a scandal celebrated his birthday in public with police, who were seen feeding him cake. This has raised concerns about police leniency in the sensitive case involving exploitation.
Web Summary : अमरावती में एक घोटाले के मुख्य आरोपी ने पुलिस के साथ सार्वजनिक रूप से अपना जन्मदिन मनाया, जिसमें पुलिस उसे केक खिलाती हुई दिखाई दी. इससे शोषण से जुड़े संवेदनशील मामले में पुलिस की नरमी पर चिंता जताई जा रही है।