Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:32 IST

AIMIM corporator Sahar Sheikh: ‘कैसे हराया?’ या विधानाने चर्चेत आलेल्या एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेखच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

AIMIM corporator Sahar Sheikh: ‘कैसे हराया?’ या विधानाने चर्चेत आलेल्या एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेखने निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असून, आता तिच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण  झाली आहे. सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहर शेख नॉट रिचेबल असल्याचे म्हटले जात होते. परंतु, यातच आता सहर शेखने वानखेडे स्टेडियमवर जाऊन क्रिकेट सामना पाहिला असून, याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे. 

उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी युनूस इकबाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना-८ वापरून व अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविला. त्यांची मुलगी सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षातून मुंब्र्यातील प्रभाग ३० मधून ती विजयी झाली. मुंबई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नगरसेविका सहर शेख उपस्थित होती.

इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?

सहर शेखने इन्स्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना गेम ओव्हर...असे लिहिले आहे. तसेच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ.. जाने तू कैसी होगी... असे गीत सहर शेखने व्हिडीओसोबत पोस्ट केले. तेरे जाने से क्या क्या हुआ... या गीताने सहर शेख यांनी सगळ्यांना पुन्हा डिवचल्याची चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. 

जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी

ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्धीकी फरहा सबाब अहमद यांनी युनूस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना-१० लागू असताना नमुना-८ वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळविला. त्याआधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी केली होती. 

दरम्यान, ठाणे तहसीलदारांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १८ मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनूस गैरहजर राहिले. मात्र, सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायाप्रत व काही कागदपत्रे सादर केली. त्याच्या पडताळणीसाठी पुन्हा २३ मार्चला सुनावणी घेण्यात आली. यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असतानाही सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.

 

टॅग्स :ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनभिवंडीभिवंडी