प्रसिद्ध अमेरिकन गायक d4vd (डेव्हिड बर्क) सध्या एका खळबळजनक प्रकरणात अडकला असून, एका १४ वर्षीय मुलीच्या हत्येच्या संशयावरून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. लॉस एंजेलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत गेल्या वर्षी एका कारमध्ये सापडला होता. ही कार गायक डेव्हिड बर्कच्या नावावर रजिस्टर होती.
d4vd च्या नावावर रजिस्टर असलेली ही कार एका ठिकाणी बेवारस सोडून दिल्यासारखी वाटत होती. त्यामुळे मुलीची हत्या केल्याच्या संशयावरुन २० वर्षीय गायकाला सध्या कोणत्याही जामिनाशिवाय पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान असे समोर आले आहे की, १४ वर्षांची सेलेस्टे रिवास हर्नांडेझ ही मुलगी २०२४ मध्ये बेपत्ता झाली होती. तिचे कुटुंब आणि पोलीस अनेक महिने तिचा शोध घेत होते, मात्र तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर ८ सप्टेंबर २०२५ रोजी हॉलीवूडमधील एका टो यार्डमध्ये उभ्या असलेल्या गाडीत तिचा मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट असल्याने तिची हत्या अनेक आठवड्यांपूर्वीच झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास 'संशयास्पद हत्या' म्हणून करत आहेत. अद्याप हत्येचे आरोप निश्चित केले गेले नसले तरी या प्रकरणातील पुराव्यांच्या आधारे डेव्हिडवर नेमके कोणते गुन्हे दाखल करायचे, यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
गायक d4vd ने 'Romantic Homicide' सारख्या गाण्यांमधून जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. तो आगामी काळात काली उचिस, २१ सॅवेज आणि स्ट्रे किड्स यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम करणार होता. त्याचा 'विदर्ड' हा अल्बमही प्रचंड गाजला होता. मात्र, या गंभीर गुन्ह्यात नाव आल्यामुळे त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील सत्य काय आहे, हे आता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.
Web Summary : Singer D4vd (David Burke) was arrested in connection to the death of a 14-year-old girl whose body was found in a car registered to him. The girl, Celeste Rivas Hernandez, was missing since 2024. Police are investigating the case as a suspected homicide.
Web Summary : गायक डी4वीडी (डेविड बर्क) को 14 वर्षीय लड़की की हत्या के संबंध में गिरफ्तार किया गया है, जिसका शव उसकी पंजीकृत कार में मिला था। लड़की, सेलेस्टे रिवास हर्नांडेज़, 2024 से लापता थी। पुलिस मामले को संदिग्ध हत्या के रूप में जांच कर रही है।